मेष
प्रिय व्यक्तिला भेटवस्तू देण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मिळालेला रिकामा वेळ पुस्तक वाचनात किंवा मनापासून आवडणारे काम करण्यात घालवाल.कावळ्याला शेव खाऊ घाला. आजची सायंकाळ जोडीदारासोबत घालवाल. परिस्थिती कशीही असली तरी स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग- मोरपिसी
वृषभ
कामात व्यस्त असलात तरी मित्रमैत्रिणींकरिता वेळ द्याल. अति मांसाहार टाळा. स्वत:ला कामात गुंतवून घेण्याकरिता ही वेळ चांगली आहे. कोणत्याही नव्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. सायंकाळी उद्यानात, बागेत फिरायला जा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ आता घेता येईल.
शुभरंग – गुलाबी
मिथुन
चांगल्या आरोग्याकरिता समतोल आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचे पालन करा. आत्मिक समाधान लाभण्याकरिता बागकाम करा. अनपेक्षितरित्या गोड बातमी कानी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग- पिवळा
कर्क
तब्येतीकडे लक्ष द्या. जोडीदाराशी वादविवाद घालू नका. अचानक मूड बदलण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. कोणाविषयीही पूर्वग्रह मनात बाळगू नका. घरातील मोठ्या व्यक्तिंचे म्हणणे ऐका. कामाच्या ताणामुळे प्रिय व्यक्तिला भेटता न येण्याची शक्यता आहे.
शुभरंग- लाल
सिंह
आज धन लाभाची शक्यता आहे. दान-धर्म करा. जोडीदाराचे प्रेम मिळेल. मनोरंजनाकरिता प्रवास घडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. तुमच्या आनंदी, उत्साही मूडमुळे सभोवतालचे वातावरणही उत्साहित होईल. मनासारख्या गोष्टी कराव्या लागतील.
शुभरंग- हिरवा
कन्या
गणपतीची आराधना करा. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. जीवनशैलीत बदल केल्यास ताणतणाव दूर होऊ शकतात. आज तुमच्यासाठी भरपूर आनंदाचा दिवस असेल. प्रिय व्यक्ती तुम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करेल. रिकाम्या वेळेचा चांगला उपयोग करून घ्याल.
शुभरंग – खाकी
तूळ
रात्रीची जागरणे टाळा. आर्थिक फायद्याकरिता भावंडांची मदत होईल. घरातील गच्चीवर किंवा उद्यानात फिरायला जाल. ठरलेली कामे वेळच्या वेळी पूर्ण कराल. मार्गदर्शनाची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. घराच्या अंगणात लावलेल्या रोपट्याला पाणी घाला.
शुभरंग- पोपटी
वृश्चिक
लहान मुलांना गूळ आणि चणे वाटा. वाहन चालवताना काळजी घ्या. चुकीचे संवाद टाळा. त्रास होऊ शकतो. गुंतवणूक करताना भविष्यातील गरजेचा विचार करा. कुटुंबात सुखद वातावरण असेल. मारुतीच्या मंदिरात जा. रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घाला. धार्मिक पुस्तकांचं वाचन करा.
शुभरंग – जांभळा
धनु
अंगणात पिवळ्या फुलांचे झाड लावा. मनाजोग्या घटना घडण्याची शक्यता आहे. सुरक्षित योजनांमध्ये पैसे गुंतवाल. मनावर ताण घेऊ नका. कुटुंबियांना वेळ द्या. स्वत:साठी वेळ द्याल. आवडत्या सौंदर्यप्रसाधनांची खरेदी कराल.
शुभरंग- चॉकलेटी
मकर
बेसनचा हलवा खा आणि इतरांनाही खाऊ घाला. मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दान-पुण्यादी कर्मे करा, धार्मिक कार्यात सहभागी व्हा. मानसिक शांतता मिळेल. वेळ काढून प्रिय व्यक्तिसोबत फिरायला जाल. घरातील जुन्या, नको असलेल्या वस्तूंची तातडीने विल्हेवाट लावा.
शुभरंग – केशरी
कुंभ
आवडत्या रंगाचा पोषाख घाला. तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या. जसे पेराल तसेच उगवेल हे लक्षात ठेवा. आज कार्यालयातील काम लवकर पूर्ण करून घरी जाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंच्या तब्येतीची काळजी घ्या. दिवसभर उत्साहित राहण्यासाठी रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या.
शुभरंग – नारिंगी
मीन
आरोग्याची काळजी घ्याल. प्रियकराकडे अनावश्यक मागण्या करणे टाळा. कुटुंबियांचा आपल्या विचारांना पाठिंबा राहिल. वेळेचे पालन करा. आवडत्या फ्लेवरचे आईस्क्रिम खाण्याची इच्छा होईल. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. तळलेले किंवा तुपकट पदार्थ खाऊ नका. अपंगांना जेवू घाला.
शुभरंग – आकाशी