February 2, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष दिवस समाधानात व शांततेत घालवा.राशीच्या व्यय स्थानात असलेला चंद्र आरोग्याच्या दृष्टीने मध्यम आहे. बाकी कामं सुरळीत पार पडतील. आर्थिक स्थितीत सुधार होणार आहे. दिवस शुभ आहे.

वृषभ आज खर्चाचं वाढतं प्रमाण त्रास देईल. मंगळ शत्रू पिडा करेल. नोकरीमध्ये तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. काम पडलं तरी फळ मिळेल.दिवस मध्यम. 

मिथुन आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त रहाल. लाभ होतील. सूर्य अधिकार वाढ करेल.घरासाठी खर्च करायला लावेल. फोन येतील. दिवस शुभ आहे. 

कर्क राशीच्या सप्तमात रवी आणि षष्ठ स्थानातील मंगळ तुमच्यात एक प्रकारचा रुबाब निर्माण करतील.लोकांवर तुमचा उत्तम प्रभाव पडेल. हाती घेतलेली कामं नीट पार पडतील. नोकरीमध्ये वरिष्ठ खूश राहतील. 

सिंह आज भाग्य साथ देणार आहे.मोठ्या जबाबदारीने तुम्ही काम पूर्ण कराल. राशीच्या पंचम स्थानातील मंगळ आणि शुक्र थोडा खर्च करेल. कायदा पाळा. चिकाटी आणि परिश्रम वाढणार आहेत.दिवस शुभ.

 कन्या आज राशीच्या सप्तम स्थानात चंद्र आहे. आर्थिक बाजू भक्कम असली तरी कुठेतरी अशांती, हुरहुर वाटेल. चिंता करू नका.लवकरच चांगले क्षण येतील. दिवस फार काही अपेक्षा न ठेवून शांतपणे घालवा. 

तूळ भागीदारी, व्यावसायिक निर्णय आणि जोडीदाराचा योग्य सल्ला असा आजचा दिवस आहे. राशीच्या चतुर्थ स्थानात रवी तुमची कामं सुरळीत मार्गी लावेल.भाग्य साथ देईल. दिवस चांगला आहे.

 वृश्चिक आज फार मोठे निर्णय किंवा आर्थिक देणंघेणं टाळा. डोळ्याचे त्रास असतील तर लक्ष द्या.कोणाशीही वाद नको. मात्र तुमचे सहकारी साथ देतील. दिवस मध्यम आहे.

 धनु द्वितीयात शनि आणि चतुर्थ चंद्र घरगुती प्रश्न निर्माण करतील.आर्थिक स्थिती सांभाळा. स्त्रियांना काही प्रकृतीच्या तक्रारी असतील तर लक्ष द्या. गुरू कृपा आहे. दिवस बरा जाईल.

मकर आज घरगुती प्रश्न डोकं वर काढतील. कोणाचे आजारपण, कोणाची मदत करावी लागेल. जोडीदाराकडून मदत मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल.दिवस चांगला आहे. 

कुंभ आज छोटे प्रवास मौजमजेसाठी खर्च आणि एखाद्या विशिष्ट कामासाठी महत्त्वाचा फोन असा दिवस आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी बाहेर पडाल. दिवस शुभ.

मीन आर्थिक प्राप्ती झाली तर खर्च उभे राहणारच. तेव्हा चिंता नको. मुलाबाळांसाठी खर्च होणार आहे. घरासाठी नवीन वस्तू, काही धार्मिक गोष्टी असा दिवस आहे. शुभ घटनांची सुरुवात होईल. जपून रहा. शुभम भवतु!!

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click