March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आजचा दिवस आपणाला लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात.व्यवसाय- धंद्यात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंद आणि खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसुख मिळेल. सामाजिक कार्यासाठी बाहेर जावे लागेल. रम्य ठिकाणच्या प्रवासाचा आनंद घ्याल.

वृषभ

आज आपण व्यापार अधिक विकसित करण्याकडे अधिक लक्ष द्याल. नवीन योजना आणि नवी विचारधारा यांमुळे व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. तरीही कामात यश मिळण्यास विलंब लागेल. दुपारनंतर व्यापारात अनुकूल स्थिती राहील. कामानिमित्त कुठे बाहेर जावे लागण्याची पण शक्यता आहे. पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे अधिकारी आपणावर प्रसन्न राहतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होण्याची शक्यता.

मिथुन

खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष पुरविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नकारात्मक विचार मनातून काढून टाका. त्यामुळे निराशेतून बाहेर पडू शकाल. अनैतिक व अप्रामाणिक कार्ये अडचणीत आणतील. शक्यतो त्यापासून दूर राहा. अचानक प्रवासाचे चांगले योग आहेत. दुपारनंतर चांगल्या प्रवृत्तीचे योग संभवतात. निराशाजनक अवस्था कमी होईल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्ती मध्ये रस घ्याल. व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अमलात आणाल. तरीही वरिष्ठांशी वाद-विवाद करू नका.

कर्क

कोणाशी भावनात्मक संबंधाने जोडले जाल व ते आज अधिक भावनाशील बनतील असे श्रीगणेश सांगतात. आनंद आणि मनोरंजक वृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा आणि रागावर ताबा ठेवा. वाणी उग्र होणार नाही याची काळजी घ्या. नवीन कार्य सुरू करायला दिवस चांगला नाही.

सिंह

व्यापार विस्ताराच्या दृष्टीने अर्थनियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिकांना त्यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या लोकांकडून व्यावसायिक लाभ होईल. धनप्राप्तीचे प्रबळ योग आहेत. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे आर्थिक विवंचना दूर होतील. चांगले कपडे, स्वादिष्ट खाणे यामुळे मन प्रफुल्लित राहील. जवळपासचा प्रवास घडेल.

कन्या

वस्त्र आणि अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष गोडी वाटेल. व्यापारातील विकासामुळे मनात आनंद छटा राहील. व्यवसायात अनुकूल काळ. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल असे श्रीगणेश सांगतात.

तुळ

आजचा दिवस मध्यम फळदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. परिवारात भांडणे होणार नाहीत याकडे लक्ष द्या. दुपारनंतर स्वास्थ्य लाभेल. सृजनशील गोष्टींकडे लक्ष द्याल. विद्यार्थ्यांना काळ अनुकूल राहील.

वृश्चिक

व्यावसायिकांना दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात निर्माण झालेल्या समस्या सुटतील. स्थावर संपत्ती संबंधित कामातही मार्ग निघेल. भावंडांशी संबंध जास्त प्रेमाचे बनतील. दुपारनंतर कामात प्रतिकूलता वाढेल. शारीरिक व मानसिक व्यग्रता अनुभवाल. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. घरातील व्यक्तींशी मतभेद होतील. धनहानीचे योग आहेत.

धनू

उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवले तर इतरांशी मतभेदाचे प्रसंग टाळू शकाल असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मनात आध्यात्मिक विचार राहतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. दुपारनंतर काळजी दूर होण्याचे उपाय मिळतील. मानसिक शांतता अनुभवाल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. प्रतिस्पर्ध्यांची इच्छा फलद्रूप होणार नाही.

मकर

श्रीगणेश सांगतात की आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विनाविघ्न पार पडेल. गृहस्थी जीवनात उग्र वातावरण. अध्यात्मात गोडी वाटेल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपारनंतर मनावर नकारात्मक विचारांचा ताबा राहील. मनात निराशेचे ठग दाटतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. घरातील कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता. गुंतवणुकीसाठी शेअर- बाजार अनुकूल राहील.

कुंभ

आज मानसिक दृष्ट्या धार्मिक भावना जास्त निर्माण होतील. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यांसाठी खर्च करावा लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. ईश्वराची आराधना मनःशांती देईल. दुपारनंतर आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. गृहस्थजीवनात सुसंवाद राहील. शरीर स्वास्थ्य पण चांगले राहील.

मीन

शेअर- सट्टा यातून आज आर्थिक लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रम्य ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रांकडून लाभ होईल. दुपारनंतर काही कारणाने मानसिक चिंता राहील. धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. घरातील वातावरण शांतिदायक राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click