July 7, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष– मित्रांच्या भेटीगाठी होतील, त्यांच्याशी गप्पा रंगतील. एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. मात्र, तुमची मते इतरांना रुचणार नाहीत. आरोग्यात सुधारणा होईल.कामात उत्साह राहिल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल, बदलीची शक्यता आहे.

वृषभ – आर्थिक बाजू बळकट होईल, जुनी येणी वसूल होतील, जीवनसाथीची काळजी घ्या, तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. केवळ मौजमजेसाठी सोबत राहणाऱ्या मित्रांना दूर ठेवा. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या, आर्थिक आवक चांगली राहिल. प्रवासात दगदग होईल.

मिथून – खरेदीची हौस पूर्ण करता येईल, जीवनसाथीचे मोलाचे सहकार्य मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे, मनात सकारात्मक विचार राहतील. रागाला वेसण घालणे आवश्यक आहे, गाडीचा वेग मर्यादित ठेवा. महत्त्वाचे काम पुढे ढकलले ठिक राहिल.

कर्क – जोडीदाराच्या मर्जीने वागा, आर्थिक बाजू चांगली राहिल. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. एखादी मनाविरुद्ध घटना घडू शकते. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. पैसा वाया जाणार नाही याची काळजी घ्या. मित्र-नातेवाईक यांची मदत मिळेल.

सिंह – घराच्या सजावटीकडे लक्ष देण्यासाठी मदत मिळेल, खर्चाचे प्रमाण वाढेल, एखादा निष्कारण खर्च होईल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. कामात उत्साह आणि चपळता राहिल.

कन्या – कामात व्यस्त राहाल, खूप वेळ त्यासाठी द्यावा लागेल. मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. प्रेमात रुसवा फुगवा राहील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. त्यामुळे आनंद होईल.

तुळ – मुलांना घवघवीत यश मिळेल, त्यांचा नावलौकिक होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उधळपट्टीला आवर घातला पाहिजे. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. प्रवास शक्यतो टाळलेले बरे. प्रवासात दगदग होईल. वेळेचा अपव्यय टाळणे महत्त्वाचे राहिल.

वृश्चिक – विविध प्रकारचे लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटी होतील, सतत लोकांच्या कोंडाळ्यात राहाल. आर्थिक फायदा होईल. तुमच्या शब्दाला किंमत राहिल. धंद्यात बरकत राहिल. विक्रीचे प्रमाण अधिक राहिल.

धनू – उसने पैसे देताना विचार करुन द्या. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. व्यवसायात गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आवडते पदार्थ ताटात दिसतील. आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल, अशी कामे करू नका.

मकर – आर्थिक देवाण-घेवाण करण्यावरुन कुरबुरी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याच्यादृष्टीने हालचाली होतील. प्रेमात यश मिळेल, मनात आनंदी विचार राहतील. भेटीगाठी होतील. व्यवसायात कागदोपत्री पुर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल.

कुंभ – जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील, आवडत्या छंदासाठी वेळ काढता येईल. कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. मनावर ताण राहणार नाही. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे व्यवहार जुळून येतील.

मीन – कामाचा ताण राहिल, आपण कुशलतेने व सर्वांची मर्जी राखून काम पूर्ण कराल. जीवनसाथीशी सूर जुळतील. एखाद्या व्यक्तीकडून भ्रमनिरास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय काम करता येईल. घरात आनंदी वातावरण राहिल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click