March 22, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार – व्यवसायात सावध राहावे लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल.

वृषभ – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विषयांची आवड निर्माण होईल.

मिथुन – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. स्वकीय व मित्रांसह हिंडण्या – फिरण्याची व प्रेक्षणीय स्थळी जाण्याची संधी मिळेल. समाजात मान – सन्मान प्राप्त झाल्याने मन आनंदित होईल.

कर्क – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

सिंह – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चा टाळणे हितावह राहील. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. सट्टा- जुगारात नुकसान संभवते.

कन्या – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशयापासून दूर राहावे.

तूळ – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आपण तयार व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो.

वृश्चिक – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च संभवतात. प्रकृती नरम होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.

धनू – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

मकर – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. मनोरंजनासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कोर्ट- कचेरीची कामे जपून करावीत.

कुंभ – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन – आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. प्रकृती उत्तम राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click