March 31, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल.लक्ष्मीची कृपा जाणवेल. परिवार आणि दाम्पत्यजीवन यात सुख संतोष अनुभवाल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानकारक व्यवहार ठेवणे आवश्यक. व्यापार्‍यांसाठी लाभदायक दिवस आहे.

वृषभ

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून ठरलेली सगळी कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज तब्येतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली वार्ता समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात.

मिथुन

नवीन कामाच्या आरंभाला चांगला दिवस नाही. जीवनसाथी व संतती यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या असे श्रीगणेशजी सांगतात. चर्चा किंवा वादविवाद यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थते मुळे उत्साहात कमी येईल. विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला दिवस आहे.

कर्क

श्रीगणेश म्हणतात की आज तुमच्यात आनंद आणि स्फूर्ती यांचा अभाव असेल. मन खिन्न असेल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमानाला ठेच न लागेल याकडे लक्ष द्या. पैसा खर्च होईल. जलाशयापासून दूर राहा.

सिंह

आजचा दिवस आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्याबरोबर लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीची भेट मन आनंदी करेल. भाग्यवृद्धीचा जबरदस्त योग आहे. नवीन काम किंवा योजना स्वीकार करायला अनुकूल दिवस आहे. संगीतकथा यात विशेष रूची राहील.

कन्या

कुटुंबात सुखशांती व कौटुंबिक आनंद यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे जेवण मिळेल. आयात- निर्यात व्यापारात चांगली सफलता मिळेल. परंतु वादविवाद, चर्चा यात उग्रता दाखवू नका असे श्रीगणेश सांगतात.

तुळ

श्रीगणेश म्हणतात की आज तुमची रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल त्यामुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मोजमजेची साधने तसेच मनोरंजन यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचे सानिध्य रोमांचक व आनंददायी असेल.

वृश्चिक

आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर व काम यांवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. कुटुंबीय आणि स्नेही यांच्याशी पटणार नाही असे श्रीगणेश सांगतात.

धनू

आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. संसारात सुख- शांती राहील. प्रिय व्यक्तींची भेट संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी आणि वडीलधारे यांची कृपादृष्टी राहील. मित्रांसह सुंदर पर्यटनाचा बेत ठरेल. उत्तम भोजन प्राप्ती मुळे आनंद वाटेल.

मकर

आज व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. बढतीचे योग आहेत. पित्याकडून लाभ होईल. संततीच्या शिक्षणा संबंधी समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ

शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यांच्या नाराजीला बळी पडाल. मौज- मस्ती हिंडण्या- फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. विदेशातून वार्ता समजतील. संतती विषयक समस्या सतावेल. प्रतिस्पर्ध्यांशी जास्त वादविवाद करू नका असे श्रीगणेश सांगतात.

मीन

तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजातही प्रतिकूलता जाणवेल. घरातील लोकांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल. आध्यात्मिकता आणि देवभक्ती मनाला शांती देईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click