February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- नवीन प्रकल्प हाती घेण्यात रस राहील. त्यात यश मिळेल. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. लोक तोंडावर बोलले नाही तरी माघारी तुमच्याबद्दल चांगले बोलतील.नोकरीत अनुकूल स्थिती राहील.

वृषभ- आर्थिक व्यवहार सांभाळून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. कागदपत्रे वाचून सही करा. वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र निष्कारण खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या. वादापासून दूर राहा.

मिथुन- काहींना कामानिमित्त प्रवास घडून येईल. प्रवास लाभदायक ठरेल. व्यवसायात विक्री चांगली राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. वाहन जपून चालवा. सरकारी कामी मार्गे लागतील. उपासना करण्यात मन रमेल. भेटवस्तू मिळेल.

कर्क- व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होतील. थोडे संयमाने वागणे, बोलणे आवश्यक आहे. वाहन जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. वाहनाची दुरुस्ती वेळीच करून घ्या. तब्येतीची काळजी घ्या. आपले कोण आणि परके कोण हे ओळखा.

सिंह- आर्थिक आवक चांगली राहील. पैशाचा ओघ सुरू राहील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. तब्येतीची काळजी घ्या.

कन्या- विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. हाती मनासारखा पैसा येईल. महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवणार नाही. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. प्रवास करावा लागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

तूळ- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. समाजसेवेत पुढाकार घ्याल. धार्मिक कार्यात मन रमेल. वाहन जपून चालवा. महत्त्वाचे काम थोडे पुढे ढकलणे इष्ट ठरेल. आर्थिक व्यवहार जपून करा. कागदपत्रे तपासून घ्या.

वृश्चिक- आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. भेटवस्तू मिळतील. प्रवास कार्य साधक ठरेल. मनासारखे भोजन मिळेल. वाहन जपून चालवा. कागदपत्रे सांभाळून ठेवा.

धनु- नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. घरी पाहुणे येतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र आपण संयमाने बोलणे आवश्यक आहे. मुले अभ्यासात प्रगती करतील.

मकर- भाग्याचे पाठबळ मिळेल. प्रवास कार्य साधक ठरेल. काहींचा पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. प्रवासात सामानाची काळजी घ्या. कायद्याची बंधने पाळा. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. जास्त दगदग आणि विचार करू नका.

कुंभ- महत्त्वाचा निरोप येईल. आर्थिक आवक चांगली राहील. घरात एखादा कार्यक्रम आयोजित कराल. व्यवसायात चांगले यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. सरकारी कामे मार्गी लागतील.

मीन- व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. सरकारी कामे पूर्ण होतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळेल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click