November 26, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. इतरांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. तुमचे वर्चस्व राहील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील.काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील.

वृषभ- नोकरीत तुमचे पारडे जड राहील. काहींची बदली होऊ शकते. तर काहींना नवीन प्रकल्पात संधी मिळू शकते. या संधीचे आपण सोने कराल. आर्थिक आवक चांगली राहील. हाती पैसे खुळखुळतील. प्रवासाचे योग येतील. जीवनसाथीच्या कलाने घ्या.

मिथुन- कुटुंबातील सदस्यामध्ये समन्वय राहील. नातेवाइकांच्या भेटी होतील. मुले अभ्यासात प्रगती करतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. एखाद्या बाबतीत अंदाज चुकू शकतात. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. प्रवास कार्य साधक ठरतील.

कर्क- लोकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्राप्ती मनासारखी राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील.

सिंह- अनुकूल परिस्थिती राहील. ग्रहमानाची साथ राहील. मुलांना योग्य मार्गदर्शन करा. नोकरीत चांगली स्थिती राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. व्यवसायात नवीन प्रयोग करण्याकडे कल राहील.

कन्या- नोकरीत सहकाऱ्यांना सांभाळून घ्या. किरकोळ वाद वाढवू नका. तुमच्या अनुरूप व्यवहार होतील. मुले प्रगती करतील. खर्च वाढता राहील. त्यामुळे बजेट गोलमाल होईल. महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा.

तूळ- लोकांची मदत मिळेल. मात्र आपण थोडे संयमाने वागणे गरजेचे आहे. मनात काळजीचे विचार राहतील. मात्र अडचणीतून मार्ग निघेल याची खात्री बाळगा. जाणकारांचा सल्ला घेण्यात कमीपणा समजू नका. घरासाठी वेळ द्यावा लागेल.

वृश्चिक- चांगली परिस्थिती आहे. उत्साहाने कामे करा. यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत धावपळ करावी लागेल. थोडे मुत्सद्दीपणाने वागा.

धनू – एखाद्या सार्वजनिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांच्या भेटी होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक बाजू बळकट राहील.

मकर- चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. तणाव निघून जाईल. गृहसौख्य चांगले राहील. प्रवास घडून येतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे.

कुंभ- मोठ्या उलाढाली होतील. त्यात आपल्याला फायदा होईल. काहींना प्रवासाचे योग येतील. देवदर्शनाची संधी मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील.

मीन- आर्थिक व्यवहार सांभाळून करा. चटकन कुणावरही विश्वास ठेवू नका. ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. इतरांना मदत करण्याच्या नादात स्वत:कडे दुर्लक्ष करू नका.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click