March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल.मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी आणि निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील. नवीन स्त्रोत प्रकट होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता श्रीगणेश सांगतात.

वृषभ

श्रीगणेश सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. गृहस्थीजीवनात माधुर्य राहील.

मिथुन

प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बळी पडाल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्त्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवा असे श्रीगणेश सांगतात. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांच्यापासून सावध राहा.

कर्क

श्रीगणेश सांगतात की मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील व्यक्तीशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. पैशाची चणचण भासेल. दुर्घटना, शस्त्रक्रिया असे योग आहेत. ईश्वरभक्तीमुळे जरा दिलासा मिळेल.

सिंह

पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याचे योग श्रीगणेश सांगतात. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीशी मुलाखात होईल पण ती आनंददायक ठरणार नाही. कोर्ट- कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब लागेल.

कन्या

शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा मिळेल. आपल्या हाता खालचे कर्मचारी आणि सहकारी यांचे सहकार्य मिळेल. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तुळ

श्रीगणेश सांगतात की आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट रोमांचक ठरेल. तन आणि मन तरतरी आणि स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी येईल पण त्यात फार खोलात उतरू नका असे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्रीगणेश सांगतात. कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबातील सदस्य, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची तब्बेत बिघडेल. जमीन, वाहन इ. च्या खरेदीपत्रा बद्दल सावध राहा.

धनू

गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभाचा योग आहे. लहान भावंडांशी चांगले सुत जमेल. मानप्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तीशी मुलाखात होण्याची शक्यता आहे.

मकर

श्रीगणेश आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेअर- सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. तब्बेतीच्या काही तक्रारी राहतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल.

कुंभ

शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिक दृष्ट्या लाभाचा दिवस. अध्यात्म व चिंतनात गोडी वाटेल.

मीन

आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. मित्र- स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल. जामीन किंवा कोर्ट कचेरी प्रकरणात न पडणे अधिक चांगले ठरेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click