March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – नोकरीत थोडे बदल होऊ शकतात. कामाचा व्याप वाढेल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. घरी लोकांची ये-जा चालू राहील. मित्र, जवळचे नातेवाईक भेटतील. भाग्याचे पाठबळ मिळेल. प्रवास सुखकर होतील. जोडीदाराची चांगली प्रगती होईल.

वृषभ – भाग्याची उत्तम साथ राहील. महत्त्वाच्या कामात सर्वांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील. क्रोधाला आवर घातला पाहिजे. जोडीदाराशी वाद घालू नका. काहींना प्रवास करावा लागेल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. नोकरीत हितशत्रंपासून सावध राहा.

तूळ – धनलाभाच्या संधी मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. स्पर्धकांना मागे टाकाल. जमिनिच्या व्यवहारात फायदा होईल. घरी आल्या गेल्याचा आदळ राहील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात बदल होऊ शकतात.

वृश्चिक – ग्रहमान अनुकूल आहे. छोट्या गोष्टींवरून भांडण उकरून काढू नका. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. घरात वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहीत.

मिथुन – जीवनसाथीची चांगली साथ राहील. भागीदारी व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. दगदगीची कामे टाळा. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. कागदपत्रे सांभाळा. थोडी गोपनीयता बाळगा.

कर्क – ग्रहमानाची अनुकूलता राहील. कामात अडचणी दूर होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे पुढे सरकतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात विक्री चांगली होईल. मुलांशी संवाद साधा.

धनू- जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. मात्र वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. भेटवस्तू मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. धनलाभ होईल. खाण्यापिण्याची लयलूट राहील. व्यवसायात सावधपणे व्यवहार करा. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

मकर – सरकारी कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. शेती, घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल.

सिंह – महत्त्वाच्या कामात दिरंगाई होईल. थोडा संयम ठेवलेला बरा. आरोग्याला जपा. मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. जोडीदाराची काळजी घ्या. नोकरीत वाद होऊ शकतात. कामाचे नियोजन नीट करा.

कन्या- घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात ताण कमी होईल. तुमच्या बोलण्यामुळे फायदा होईल. जोडीदाराची काळजी घ्या.

कुंभ – नोकरीत वादापासून दूर राहा. तुमचे वर्चस्व साहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू मिळतील. सुखसोयी मिळतील. महत्त्वाच्या कामात दिरंगाई होईल. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. मात्र संयम सोडू नका.

मीन – ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य मिळेल. नोकरीत बधतीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. सहजासहजी यश मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मुलांना अपेक्षित यश मिळेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click