मेष
श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील.धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती लावाल. तीर्थयात्रेचे योग आहेत. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी- धंद्यात किंवा घरी मतभेद होतील.
वृषभ
हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. नवीन काम सुरू करायला वेळ योग्य नाही. यात्रा- प्रवासात विघ्ने येतील. नोकरी- व्यवसायाच्या जागी कामाचा बोझा वाढेल, त्यामुळे थकून जाल. योग साधना व आध्यात्मिकता आपणाला मानसिक शांतता देईल असे श्रीगणेश सांगतात.
मिथुन
श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल. पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी, पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने आणि वाहन खरेदीचे योग आहेत. मन आनंदाने भरून जाईल. भिन्नलिंगीय व्यक्तीचे आकर्षण राहील. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल आणि लोकप्रियता वाढेल. व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल. दांपत्यसुखाची प्राप्ती होईल.
कर्क
आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल. त्यांच्या समवेत घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता आणि यश मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. तब्बेत चांगली राहील. प्रतिस्पर्ध्यांची चाल निष्फळ ठरेल.
सिंह
श्रीगणेश सांगतात की आज आपण तन-मन देहाने स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीशी झालेली भेट सुखद ठरेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला काळ म्हटला पाहिजे. हातून एखादे पुण्यकार्य घडेल. आध्यात्मिकतेकडे फल झुकेल.
कन्या
आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. तब्बेत यथा तथाच राहील. मनाला चिंता घेरतील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची तब्बेत बिघडेल. आपल्याच लोकांशी खटके उडतील व मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान भंगणार नाही याची काळजी घ्या. घर, वाहनाच्या खरेदी- विक्रीसाठी काळ चांगला नाही. पाण्यापासून भीती आहे.
तुळ
नवीन कामाचा श्रीगणेशा करायला दिवस चांगला आहे. भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या धार्मिक स्थानी प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या वार्ता येतील. भावा- बहिणींशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. श्रीगणेश कृपेने आज शरीर व मनाचे स्वास्थ्य अनुभवाल.
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. मिष्टान्न भोजन मिळेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल.
धनू
श्रीगणेशांच्या मते संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून धार्मिक व मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग आणि मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. जीवनसाथी कडून सुख- समाधान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. तब्बेत चांगली राहील.
मकर
तब्बेतीच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च कराल. आध्यात्मिक व धार्मिक व्यवहार वाढतील. शत्रू सतावून सोडेल. डाव्या डोळ्याचा त्रास होईल. स्त्री आणि संततीची काळजी राहील. दुर्घटनेपासून जपा असा सल्ला श्रीगणेश देत आहेत.
कुंभ
मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील. गृहस्थजीवन आणि दांपत्यजीवन यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. मित्रमंडळ आणि वडीलधार्यांकडून तसेच नोकरी धंद्यात बहुविध लाभप्राप्ती होईल. श्रीगणेश कृपेने उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल.
मीन
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. व्यापार्यांची येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होतील आणि परिवारात आनंद पसरेल. सरकारकडून लाभ होतील. सार्वजनिक मान- सन्मान वाढतील. तसेच गृहस्थीजीवनात सुख- शांतीने धन्यता वाटेल.