October 2, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष: महत्त्वाची कामे सायंकाळच्या आत पूर्ण करून घ्या. जोडीदाराची चांगली साथ राहील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. सहकारी मदत करतील. व्यवसाय विक्री चांगली होईल. जवळच्या लोकांशी संवाद राहील.नावलौकिकात भर पडेल.

वृषभ: महत्त्वाचे काम थोडे पुढे ढकलणे ठीक राहील. किचकट कामे करताना कुणाला दुखावू नका. तब्येतीची काळजी घ्या. जोडीदाराशी मधूर शब्दांत संभाषण करा. नोकरीत थोडे सतर्क राहावे. प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे. नाही तर ऐनवेळी धावपळ करावी लागेल.

मिथुन: महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत उरका. अन्यथा दगदग होईल. प्रवासाचे योग येतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांशी संपर्क राहील.

कर्क: नोकरीत थोडी अस्थिरता जाणवेल. मात्र, खूप काळजी करण्याचे कारण नाही. हळूहळू अडचणी दूर होतील. नातेवाइकांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथी चांगली मदत करेल.

सिंह: नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मात्र, एखाद्या कारणावरून गैरसमज होतील. काहींना प्रवास करावा लागेल. नातेवाइकांच्या भेटी होतील. घरात किरकोळ कारणावरून कुरबूर होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल.

कन्या: धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वसुलीसाठी दुपारच्या आत प्रयत्न करा. मालमत्तेच्या व्यवहारात अनुकूलता राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अचानक चांगली संधी मिळेल. नोकरीत पगारवाढीची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील.

तूळ: आर्थिक आवक चांगली राहील. अचानक एखादा व्यवहार फायदा देऊन जाईल. मनात आनंदी विचार राहतील. ग्रहमानाची अनुकूलता राहील. दूरच्या प्रवासाचे योग. भावंडांच्या भेटीगाठी होतील. खाण्यापिण्याची लयलूट राहील. व्यवसायात भरभराट होईल.

वृश्चिक: महत्त्वाचे काम पुढे ढकला. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. काहींना प्रवास करावा लागेल. हातून दानधर्म घडेल. तुम्हाला यश मिळणारच आहे. मात्र, रागाच्या भरात कुणाचा अपमान करू नका. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ.

धनु: महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत पूर्ण करून घ्या. भेटीगाठी होतील. प्रवास होतील. देवदर्शन होईल. ग्रहमानाची अनुकूलता राहील. महत्त्वाचे लोक भेटतील. वाहन जपून चालवा. अचानक एखादा खर्च करावा लागेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

मकर: धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मात्र, त्यासाठी थोडी दगदग होऊ शकते. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. ग्रहमानाची साथ राहील. घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता. नोकरीत बदली होऊ शकते. मुलाखतीत यश मिळेल.

कुंभ: आर्थिक बाजू बळकट राहील. मनासारखी धनप्राप्ती होईल. दूरचे प्रवास करावे लागतील. नोकरीत अचानक चांगली संधी मिळेल. वादाचे प्रसंग खुबीने टाळा. वरिष्ठांकडून कौतुक होईल. उपयुक्त असे मार्गदर्शन मिळेल.

मीन: महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, थोडा संयम ठेवा. सायंकाळच्या नंतर कामात अपेक्षित यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या. मुलांना घवघवीत यश मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click