May 26, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष: महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. चांगली साथ राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कामाचा ताण कमी राहील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.योग्य आणि हितचिंतक व्यक्तींचा सल्ला मिळेल.

वृषभ: आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. जीवनसाथीशी वाद होऊ शकतात. नोकरीत गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कुणाला टाकून बोलू नका. प्रवासात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

मिथुन: मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल. काहींना प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. जोडीदाराची काळजी घ्या. आर्थिक आवक सामान्य राहील.

कर्क: धावपळीचा दिवस राहील. विविध कामांमध्ये व्यस्त राहाल. घरी पाहुणे येतील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मुलांच्या अडचणी समजून घ्या. जोडीदार तुमच्या कामात मदत करेल. तब्येतीची काळजी घ्या. थोडा आरामासाठी वेळ काढा.

सिंह: जवळचे प्रवास करावे लागतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वाद होतील. घरात किरकोळ तणाव राहील. जोडीदाराशी काही कारणाने गैरसमज होतील.

कन्या: आर्थिक आवक मनासारखी राहील. जुनी येणी वसूल होतील. वडिलोपार्जित मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांशी थोडे गैरसमज होऊ शकतात. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. तुमच्या शब्दांचा मान राखला जाईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल.

तूळ: मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील. विविध कामांमध्ये यश मिळेल. जोडीदाराशी गोडीगुलाबीने वागणे आवश्यक आहे. भावंडांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल. आर्थिक आवक उत्तम राहील. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे तपासून घ्या.

वृश्चिक: आर्थिक आवक चांगली राहील. वसुलीची कामे सकाळच्या प्रहरात केली तर चांगले राहील. महत्त्वाच्या कामात दगदग होईल. बराच वेळ जाईल. प्रवास करावा लागेल. वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या. कायद्याची बंधने पाळा. जोडीदाराशी संभाषण करा.

धनु: अनुकूल परिस्थिती राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. विविध प्रकारचे आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. योग्य सल्ला मिळेल. जोडीदाराचे मोलाचे सहकार्य मिळेल. त्यामुळे जोडीदाराचे महत्त्व समजेल. भावंडांशी संबंध सुधारतील.

मकर: नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. नोकरदारांच्या जबाबदारीत बदल होऊ शकतात. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता राहील. त्यामुळे गृहिणींची धांदल उडेल. आर्थिक आवक चांगली राहील. जोडीदार तुमची काळजी घेईल. घरातील कामांचा आढावा घ्या.

कुंभ: भाग्याची उत्तम साथ राहील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. धार्मिक यात्रा, देवदर्शन घडेल. नोकरीत थोडा संयम ठेवलेला बरा. आर्थिक स्थिती चांगली राहील. महत्त्वाचे निरोप येतील. कामातील कागदोपत्री पूर्तता सहज पूर्ण होईल.

मीन: विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र, महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. घरात सदस्यांशी समन्वय राहील. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. पूजापाठ करण्यात मन रमेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click