March 22, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आपण आज शारीरिक आणि मानसिक स्फूर्ति अनुभवाल.घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायातही समाधान समाजात पतप्रतिष्ठा वाढेल. मित्र परिवाराबरोबर आनंदाने सहल- भ्रमंती व वस्त्रालंकाराची संधी प्राप्त होईल.

वृषभ

गणेशजी सांगतात की, आज अचानक खर्चाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात संकटे येतील. मन उद्विग्न होईल. परंतु दुपारनंतर घरातील वातावरण सुख- शांतीचे असेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्ये सफल होतील. व्यवसायात सहकार्यांचे सहकार्य चांगले लाभेल. शत्रूवर मात कराल.

मिथुन

घरदार व जमीनजुमला या विषयाच्या कागदकामाबाबत आज दक्ष रहावे लागेल. कुटुंबियाबरोबर विनाकारण वाद होतील. संतती विषयी काळजी लागून राहील. विद्याभ्यासात संकटे. आकस्मिक खर्चाचे योग. मित्रभेटीने आनंद होईल.

कर्क

अध्यात्म आणि गूढ विद्या करून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला असल्याचे श्रीगणेश सुचवतात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य तुम्हाला आनंदी ठेवेल. आज तुम्ही अधिक संवेदनशील बनाल. दुपारनंतर चिंतीत रहाल. आनंद आणि स्फूर्ती यांचा आभाव राहील. कुटुंबियान्च्यासोबत मतभेद होतील. खर्च वाढेल.

सिंह

आज आपण आपल्या गोड शब्दांनी कार्य सिद्ध कराल. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल. परंतु दुपारनंतर अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका, असा गणेशजींचा सल्ला आहे. आप्तेष्टांकडून फायदा. मित्रांची भेट होईल. शत्रूशी सामना करू शकाल. प्रेमपूर्ण संबंध आपल्या स्वभावात मृदुता आणतील.

कन्या

गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला शुभफलदायी आहे. तुमच्या प्रभावी बोलण्याने तुम्ही प्रेमाचे व लाभदायक संबंध प्रस्थापित कराल. आपल्याजवळची वैचारिक समृद्धता लोकांना प्रभावीत करेल. व्यावसायिक दृष्टिने आजचा दिवस फायद्याचा. मन आनंदीत राहील. आर्थिक लाभाची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. वाद टाळून बौद्धिक चर्चेचा आनंद लुटा.

तुळ

गणेशजी सुचवतात की, आकस्मिक खर्चाबाबत सावधान रहा. शरीर व मन अस्वस्थ असल्यामुळे मित्रांबरोबर भांडण व वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कोर्ट कचेरी पासून जरा संभाळून रहा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. मानसिक स्वस्थता लाभेल व मधुर वाणीने लोकांसोबत आनंद लुटाल.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आज आपल्याला अनेक बाबींत लाभ, यश व किर्ती मिळेल. धनप्राप्तीचे योगही संभवतात. मित्रांसाठी पैसा खर्च करावा लागेल. परंतु त्यांच्या बरोबर फिरण्याचा आनंद मिळेल. दुपार नंतर मात्र शरीर व मन अस्वस्थ राहील. गर्वामुळे कोणाबरोबर वाद होणार नाही याची काळजी घ्या. स्वभाव रागीट बनेल.

धनू

आजचा आपला दिवस लाभदायी असेल असे गणेशजी सांगतात. घर आणि व्यवसाय दोन्हीही क्षेत्रात आज आनंद व समाधानाचे वातावरण राहील. प्रकृती ठीक राहील. व्यवसाय धंद्यात फायदा, तसेच सरकारी कामातही लाभ होईल. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती मिळेल. आपली प्राप्ती आणि व्यापार यात वाढ होईल. एखादया रमणीय स्थळाला भेट ध्याल.

मकर

आज संपूर्ण शुभफल देणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. विदेशातून आप्तेष्टांची काही चांगली बातमी आपले मन आनंदित करेल. धार्मिक यात्रा घडेल. मनात असलेली एखादी कामासंबंधीची योजना पूर्ण होईल. व्यापारीवर्गाला व्यापारातून फायदा मिळेल.

कुंभ

आजचा पूर्ण दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे गणेशजी म्हणतात. राग व बोलणे यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी वाद करू नका. दुपारनंतरचा आपला वेळ मित्रांसोबत आनंदात जाईल. एखादा धार्मिक प्रवास होईल. परदेशातून चांगल्या बातम्या समजतील.

मीन

आज दैनंदिन कामात शांतता मिळेल. मित्र व ओळखीच्या लोकांबरोबर जाऊन एखादया मनोरंजन स्थळाचा आनंद लुटण्याचे ठरवू शकाल. व्यापारात भागीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. परंतु दुपारनंतर आपले स्वास्थ्य बिघडेल. कुटुंबियांशी मतभेद होऊन मन दुःखी बनेल. बोलण्यावर ताबा ठेवा. आर्थिक खर्चही होऊ शकतात. पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी देताहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click