March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी असेल.स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्या. तब्बेत सांभाळा कारण पोटाच्या तक्रारी उदभवतील. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी मतभेदाची शक्यता.

वृषभ

श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू आणि कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कारण त्यांना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन

आजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्ट्या सावध राहा. श्रीगणेश गुंतवणूकदारांना इशारा देतात की सावधपणे पैसे गुंतवा. मन चंचल राहील. त्यामुळे विचार क्षणात बदलतील. तन-मनाला स्फूर्ती लाभेल. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस चांगला. विरोधकांना नामोहरम कराल. आनंद, उल्हास आणि भाग्योदयपूर्ण दिवस आहे.

कर्क

आज मध्यमफलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. तब्बेत ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार नाही. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह

आजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील आणि वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान- सम्मान मिळेल. उतावीळपणाने वागू नका. संताप वाढेल. पोटदुखीचा त्रास संभवतो. सबब खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. पूर्ण दिवस आनंदात जाईल.

कन्या

दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरी संबंधी सावध राहा. अचानक खर्च उद्भवतील. मित्रांबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी राहील. तब्बेतीकडे लक्ष पुरवा. नोकरीदारांनी हाताखाली काम करणारांपासून सावध राहावे.

तुळ

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी होतील आणि रम्यस्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. घरात पत्नी व पुत्र यांच्याकडून सुख मिळेल. धनप्राप्तीचे योग आहेत. उत्पन्नात वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. स्त्रियांकडून फायदा होईल. वैवाहिक सुख मनासारखे मिळेल.

वृश्चिक

आजचा दिवस शुभफलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. विनाविलंब सर्व कामे पूर्ण होतील. मान-सम्मान मिळेल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. उच्चाधिकारी व जुन्या जाणत्या लोकांची कृपादृष्टी राहील. तब्बेत चांगली राहील. धनलाभाचे योग. व्यापारीवर्गाला व्यापारानिमित्त बाहेर जाण्याचे योग आहेत. मित्र व संबंधितांकडून लाभ होतील. संततीची समाधानकारक प्रगती होईल.

धनू

श्रीगणेश आपणांस यात्रा- प्रवास स्थगित करण्याची सूचना देत आहेत. शरीरात थकवा जाणवेल. तब्बेतही यथातथाच राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. दैव साथ देत नाही असे वाटेल. जोखमीच्या कामापासून दूर राहा. कार्यसाफल्याचे योग कमी आहेत. वरिष्ठांशी संघर्ष होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.

मकर

ऑफिस तथा व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील असे श्रीगणेश सांगतात. ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. व्यावहारिक व सामाजिक कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे याकडे लक्ष राहील. अचानक खर्च उद्भवतील. भागीदारीत आपापसांत मतभेद होतील. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. संताप आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहा. श्रीगणेश सूचना देतात की नवीन काम आज सुरू करू नका.

कुंभ

आज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. भिन्न व्यक्तींशी परिचय होतील आणि मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन व नवी वस्त्रे यांमुळे मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. समाजात मान- सम्मान वाढेल. वाहनसुख मिळेल. श्रीगणेशाच्या आशीर्वादामुळे भागीदारीत लाभ होतील.

मीन

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभ फलदायी राहील. दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरक्षित पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावीळ बनेल. तरी बोलण्यात मर्यादा आणि वर्तनात नम्रता ठेवा. माहेरहून वार्ता येतील. सहकारी आणि नोकरांकडून सहकार्य चांगले मिळेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click