March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील.द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक- मानसिक बेचैनी राहील. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील.

वृषभ

व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून लाभ आणि सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान- सन्मान मिळेल. विवाहाचे योग आहेत. संततीकडून शुभवार्ता मिळतील.

मिथुन

शारीरिक व मानसिक सुख मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. अधिकारी प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्याकडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी राहणार नाहीत. दांपत्यजीवनात सुख, आनंद मिळेल असे श्रीगणेश सांगतात.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून सुवार्ता मिळतील. धार्मिक कार्य किंवा यात्रा यावर खर्च होईल. कुटुंबीय आणि पदाधिकारी यांच्या समवेत दिवस सुखकारक राहील. नोकरदारांना पण लाभ मिळेल.

सिंह

आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल. निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील व्यक्तींशी मतभेद होतील. अनैतिक कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. इष्ट देवतेचे नामस्मरण आणि आध्यात्मिक विचार आपणाला योग्य मार्गदर्शन करतील.

कन्या

श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इ. खरेदी होईल. भिन्नलिंगीय व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. व्यापारात भागीदारांबरोबर चांगले संबंध राहतील. धनलाभ होईल.

तुळ

श्रीगणेशांच्या मते आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता आणि यश मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल आणि सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. मैत्रिणींशी मुलाखात होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी यांना पराभूत कराल.

वृश्चिक

आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीची काळजी राहील. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक नियोजनासाठी वेळ चांगली आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद यात भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शेअर- सट्टा यांचे आकर्षण हानी करेल.

धनू

श्रीगणेश सांगतात की आज जास्त संवेदनशीलते मुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. तब्बेतीच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. निद्रानाशाचा त्रास होईल. जलाशयापासून जपून राहणे हिताचे ठरेल.

मकर

आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहा. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार धंद्यात लाभ होईल. शेअर- सट्टायात गुंतवलेले पैसे लाभ देतील. मित्र, स्वकीय आणि भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना सिद्धी प्राप्त होईल. श्रीगणेशाची आपणावर कृपा राहील.

कुंभ

श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. तब्बेत बिघडेल. विद्यार्थ्यांना मध्यम दिवस. नकारात्मक विचार दूर करा असे श्रीगणेश सांगतात.

मीन

आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. धार्मिक- मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. प्रवास होईल. दांपत्यजीवनात आनंद वाटेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click