March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आज मित्रांच्या संगतीमध्ये आनदात वेळ घालवाल.मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच तुम्हालाही त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील. संततीकडूनही फायदा होईल. नैसर्गिक ठिकाणी जाण्याचे बेत आखाल. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ

नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नवकार्यारंभ यशस्वीरीत्या कराल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. गृहस्थीजीवनात माधुर्य वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. सरकारी लाभ मिळेल.

मिथुन

कोणतेही नवे काम सुरू करायला दिवस अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. शरीरात थकवा आणि आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. नोकरी- व्यवसायात पण विपरित अवस्था असेल. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. खर्चही अधिक होतील. महत्त्वपूर्ण कामातील कोणताही निर्णय आज घेऊ नका.

कर्क

प्रत्येक गोष्टीत आज जपून व्यवहार करा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करू नका. वाणी आणि संतापावर संयम राखा. त्यामुळे संकटे टळतील. खर्च वाढण्याची शक्यता. निषेधार्ह आणि अनैतिक कामांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणश देतात. ईश्वराचे नामस्मरण आणि आध्यात्मिकता लाभदायक ठरेल.

सिंह

वैवाहिक जीवनात आपापसांतील कुरबुरीमुळे पत्नी व पती यांच्यात तणाव वाढेल. साथीदाराची तब्बेत बिघडेल. भागीदार आणि व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद यात पडू नका. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक व बाह्य क्षेत्रात यश मिळणार नाही.

कन्या

आज उत्साह आणि स्वास्थ्य अनुभवाल. घरात व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. रुग्णांची तब्बेत सुधारेल. माहेरहून आनंदी वार्ता येतील. कार्यसंपन्नतेमुळे यश मिळेल. खर्च अपेक्षेपेक्षा जास्त होतील.

तुळ

आजचा दिवस मध्यम फलदायी जाईल. संततीची काळजी सतावेल. विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद-विवाद, बौद्धिक चर्चा यापासून दूर राहा. आज सुरू केलेले काम पूर्ण होणार नाही. प्रियव्यक्तीची भेट होईल. अपमानाचे प्रसंग येतील. प्रवास टाळा.

वृश्चिक

आज शांतचित्ताने दिवस घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. चिंताग्रस्त मन आणि अस्वस्थ शरीर आपणाला ग्रासून टाकेल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज सांभाळून करावेत.

धनू

नवकार्यारंभास शुभ दिवस. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे बेत ठरवाल. तब्बेत चांगली राहील. भाग्योदय होईल. रहस्य आणि आध्यात्मिकते मध्ये गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक दृष्टिकोनातून मानसन्मान मिळेल.

मकर

आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. बोलण्यातील संयमच आपणाला संकटातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. तब्बेत साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.

कुंभ

श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आनंदी राहाल. भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसमवेत प्रवास आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आध्यात्मिक विचार आपले मन आणि अंतःकरण यांना स्पर्श करतील.

मीन

अतिलोभ आणि हव्यास यात फसू नका असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आर्थिक विषयात खूप सावध राहा. आर्थिक गुंतवणूक शिक्का, सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. तब्बेत बिघडू शकते. मनाची एकाग्रता राहणार नाही. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click