February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल.कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्ट्या विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्या. खूप कामांमुळे कामात दिरंगाई होईल. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल.

वृषभ

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. धार्मिक स्थळाला भेट देऊन मन सात्विक बनेल. तरीही स्वास्थ्य सांभाळा. कामाचा ताण वाढेल.

मिथुन

आज अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे. डोके शांत ठेवा. मानहानी होणार नाही याचे लक्ष ठेवा. आज तुम्ही मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवा त वादविवाद टाळा यातच आपला फायदा आहे. खर्चामुळे आर्थिक चणचण येईल. मानसिक शांतीसाठी ईश्वराची आराधना करा.

कर्क

आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल पण दीर्घकाळ स्मृतीत राहील. समाजात मानसन्मान वाढेल.

सिंह

श्रीगणेश सांगतात की आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांपासूनही जपूनच राहा. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्याने मन उदास होईल.

कन्या

आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. संतप्तीविषयी चिंता लागून राहील. सट्टा- शेअर बाजार यात जपून व्यवहार करा. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेच भाग घेऊ नका असा सल्ला श्रीगणेश देतात.

तुळ

आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. मातेविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. समाजात अपमानित तर होणार नाही या याकडे लक्ष द्या.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आज आपला लाभदायी दिवस आहे. आर्थिक लाभांबरोबर भाग्यातही लाभ होईल. मित्रांबरोबरच्या संबंधात प्रेम असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी योग्य काळ. छोटासा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल.

धनू

आज आपल्या मनाची द्विधा होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश बनेल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सल्ला देतात. घरी व व्यवसाय-धंद्यात कामाचा व्याप वाढेल.

मकर

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. तब्बेत चांगली राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही यांच्या भेटीने एकदम खुश राहाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील आणि वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल.

कुंभ

आज कोणाकडून रक्कम स्वीकारणे किंवा पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका असे श्रीगणेश सुचवितात. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे.

मीन

सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. शुभवार्ता समजेल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. अचानक धनप्राप्तीचा संभव आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click