December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – कोणत्याही प्रकारच्या संकटात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. गृहस्थी जीवनात वातावरण आनंदी राहील.वरिष्ठांची मर्जी राहील. बढतीची शक्यता आहे. योजनेनुसार आर्थिक लाभ होतील.

वृषभ – आपला हळवेपणा आपणाला बेचैन करील असे श्रीगणेश सांगतात. शरीर स्वास्थ्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संघर्षाचे प्रसंग टाळा.

मिथुन – आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजनाच्या ‘मूड’ मध्ये राहाल. मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील. रुचकर खाणे आणि उंची वस्त्रे व दागिने उपलब्ध होतील. दुपारनंतर आपण जास्त हळवे बनाल.

कर्क – व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, असे श्रीगणेश सांगतात. माहेरहून आनंदाच्या वार्ता मिळतील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला अनुकूल काळ. सामाजिक सन्मान मिळतील. भागीदारांकडून लाभ होतील.

सिंह – प्रणयासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता आणि उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे.

कन्या – श्रीगणेशांचे सांगणे आहे की आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी आणि चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर अपमान होणार नाही याची काळजी घ्या. धनहानी संभवते. रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ – नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मनात औदासिन्य पसरेल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.

वृश्चिक – ठरवलेले काम पूर्ण न झाल्याने निराशा येईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा अंतिम निर्णय घेऊ नये असा सल्ला श्रीगणेश देतात. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसमवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

धनु – आजचा दिवस आपणासाठी शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. कामेपूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साही आणि ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहने कराल. यात्रा घडेल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती राहील.

मकर – बोलणे आणि वागणे यामुळे भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. संतापाचे प्रमाण वाढेल. पण कोणाशी वाद वा मतभेद होऊ देऊ नका. मन व्यग्र राहील. अध्यात्माच्या आधाराने मन शांत ठेवा. दुपारनंतर स्फूर्ती आणि उत्साह वाढेल.

कुंभ – सर्व दृष्टींनी आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल आणि परिणाम स्वरूप मान प्रतिष्ठा वाढेल. विवाहोत्सुकांना मनासारखा जोडीदार लाभेल. त्यामुळे आनंद वाढेल. दुपारनंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल. आणखी वाचा

मीन – श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला सर्व दृष्टींनी लाभदायक आहे. परोपकाराचे कार्य हातून घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. उच्च अधिकारी वर्ग आनंदाने आपल्या कामाचे कौतुक करतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click