March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आज आपणात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील.तसेच रागाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून रागावर ताबा ठेवा. कार्यालयात अधिकारी, घरात कुटुंबीय आणि विरोधक यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले. एखाद्या धार्मिक कार्यात किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा प्रसंग येईल.

वृषभ

कामाचा खूप व्याप आणि खाण्यापिण्याची बेपर्वाही यामुळे तब्बेत बिघडेल. वेळेवर जेवण आणि झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल. योग, ध्यान आणि आध्यात्मिक वाचन दिलासा देईल असे श्रीगणेश सांगतात.

मिथुन

मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान- प्रतिष्ठा वाढेल. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल. प्रणय- प्रसंगाची पूर्वपीठिका तयार होईल. सामाजिक जीवनात मान- सन्मानाचे धनी बनाल. हातून दान- धर्म आणि विधायक कामे होतील.

कर्क

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा दिवस खुशीचा आणि याशाचा जाईल. कुटुंबात सुख- शांती आणि समाधान राहील. नोकरदारांना ऑफिस मध्ये अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून आणि मातुल घराण्याकडून लाभ होईल. तब्बेत चांगली राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

सिंह

श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांकडे अधिक गोडी लागेल. साहित्य आणि कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती केल्याने प्रेरणा मिळेल. प्रेमिक आणि प्रिय व्यक्तींशी भेट आणि मुलाखात होईल. संततीकडून शुभ वार्ता मिळतील. धार्मिक आणि परोपकाराचे कार्य कराल आणि मनाला आनंद वाटेल.

कन्या

आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड देण्यास तयार राहावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. तब्बेती विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील व्यक्तींशी खटका उडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इ. संबंधित समस्या उद्भवतील. पैसा खर्च होईल.

तुळ

सांप्रतकाळी भाग्योदय झाल्याने धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा राहील आणि खेळीमेळीचे वातावरण असेल. लहानशा धार्मिक यात्रेचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या वार्ता येतील.

वृश्चिक

नकारात्मक मानसिक वृत्ती टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. ‘मौनं सर्वार्‍यां साधनम्’ या नीतीने वागा म्हणजे कुटुंबातील व्यक्तींशी संघर्ष होणार नाही. तब्बेतीच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.

धनू

आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची, विशेषतः तीर्थयात्रेची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. दांपत्यजीवनात जवळीक आणि गोडी निर्माण होईल. समाजात यश आणि कीर्ती वाढेल.

मकर

आज आपण धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांत मग्न राहाल. पूजा- पाठ, धार्मिक कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित आणि कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. खूप कष्ट आणि कमी यश यामुळे निराशा पैदा होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या. दांपत्य जीवनात खटका उडेल. श्रीगणेश आपली संकटे कमी करतील.

कुंभ

नवे काम हाती घेऊ शकाल. श्रीगणेशाची आपणावर कृपा आहे. नोकरी धंद्यात लाभ होतील आणि जादा उत्पन्न मिळेल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. पत्नी आणि पुत्राकडून सुख समाधान लाभेल. प्रवास, सहली आणि वैवाहिक योग आहेत. शरीर व मन आनंदी राहील.

मीन

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी आहे. कामातील यश आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. तब्बेत चांगली राहील. घरात सुख शांती नांदेल. प्रगतीचे योग आहेत. सरकारकडून लाभ होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click