February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – श्रीगणेश सांगतात की आज सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींत संपर्क साधाल. गूढ, रहस्यमय विद्या आणि गाढ चिंतनशक्ती आपला मानसिक भार हलका करील. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी चांगला योग आहे.

वृषभ – श्रीगणेश कृपेने आपल्या जीवनसाथीच्या जवळीकीचे सुख प्राप्त होईल. कुटुंबीयांसमवेत सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे घडेल. त्यामुळे वेळ आनंदात जाईल. शरीर आणि मनाला प्रसन्न वाटेल.

मिथुन – अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य राहील. कामात यश आणि कीर्ती लाभेल. इतरांशी बातचित करताना रागावर ताबा ठेवा आणि मितभाषी राहा म्हणजे मतभेदाचे प्रसंग उद्भवणार नाहीत.

कर्क – 
शांतपणाने दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमिकांमध्ये वादविवाद झाल्यामुळे रुसवे- फुगवे होतील.

सिंह – श्रीगणेश सांगतात की मानसिक अस्वस्थता राहील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करायला दिवस योग्य नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. नोकरीत स्त्री वर्गापासून जपून राहा.

कन्या – 
विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा श्रीगणेश देतात. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भाऊ- बहिणींशी ताळमेळ जुळेल. मित्र आणि स्नेह्यांशी संवाद घडतील. गूढ, रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील.

तूळ – आज मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम राहणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांशी मतभेद होतील. नाहक खर्च होईल. तब्बेत बिघडेल. मनात ग्लानी निर्माण होईल.

वृश्चिक – श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबातील व्यक्तींशी वागण्यात दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील प्रिय व्यक्तींशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल.

धनु – आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे भांडणाचे कारण ठरेल. दुर्घटनेपासून जपा. आजारावर खर्च होईल.

मकर – श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तींशी मुलाखत रोमांचक बनेल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्‍यांना धंद्यात आणि नोकरदारांसाठी नोकरीत उत्पन्न वाढेल.

कुंभ – प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. नोकरी- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. तब्बेत चांगली राहील. मानसिक उत्साह जाणवेल.

मीन – भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने निराशा पैदा होईल. नशिबाची साथ नाही असे वाटेल. कार्यालयात अधिकारी वर्गाशी काम करताना जपून वागण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click