November 30, 2021

आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

मेष

श्रीगणेश सांगतात की मानसिक व्यग्रतेत आजचा दिवस जाईल.जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. स्थावर संपत्ती विषयीची चर्चा टाळा. वाहन जपून चालवा तसेच जलाशयापासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी मध्यम काळ.

वृषभ

श्रीगणेश कृपेने आज शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष द्याल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद मिळेल.

मिथुन

श्रीगणेश सांगतात की काम होण्यास वेळ लागेल पण प्रयत्न चालू ठेवा. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍याबरोबर वातावरण खेळीमेळीचे राहील. मित्र आणि शुभेच्छुकांशी भेट झाल्याने आनंद मिळेल.

कर्क

मित्र आणि स्नेही यांच्याबरोबर आजचा दिवस तुम्ही उल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. प्रवास व सहली यांची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घ्याल. भाऊक बनाल. आर्थिक लाभ होण्याचा दिवस आहे.

सिंह

श्रीगणेश सांगतात की खूप भावविवश बनल्याने मन गुंतुन राहील. स्त्री वर्गापासून आज सांभाळून राहा. दलाली चर्चा वाद यापासून सांभाळून राहाल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत काळजी घ्या. वर्तनात संयम आणि विवेक ठेवा. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या

आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल असे श्रीगणेश सांगतात. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात स्त्रीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. मित्राबरोबर एखाद्या रम्य- मनोहर स्थळी जाल. संततीकडून शुभवार्ता समजतील.

तुळ

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरीष्ठासोबत महत्त्वपूर्ण चर्चा कराल. पदोन्नती होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मातेकडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.

वृश्चिक

श्रीगणेश सुचवितात की, नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जपूनच काम करा. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीबरोबर मतभेद. आज महत्त्वपूर्ण निर्णय टाळा. खर्च वाढेल. लहानसे प्रवास ठरवाल.

धनू

आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचे श्रीगणेश सुचवतात. आजारावरील उपचारही प्रारंभ करू नका. वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवा. अधिक संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्या. पैसा अधिक खर्च होईल. अनैतिक संबंध निषेधार्ह कामापासून दूर राहा. ईश्वराचे ध्यान- योग, आराधना यामुळे मनाला शांतता मिळेल.

मकर

श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. लहान प्रवास घडतील.

कुंभ

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसमवेत दिवस चांगला जाईल. नोकरी धंद्यात सहकार्‍यांचे सहकार्य चांगले मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

मीन

श्रीगणेश सांगतात की आज आपली सृजनशक्ती अधिकच चमकेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्यविश्वाची सफर कराल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ. स्वभावात विशेष भावुकता येईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *