मेष- आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रसंग येतील.
वृषभ – आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल.आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर होईल.
मिथुन – नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडाल.
कर्क – आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील.
सिंह – कोर्ट कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या.
कन्या – आपणांसाठी घर, कुटुंबीय, व्यापार अशी सर्व क्षेत्रे लाभ देण्यासाठी तयार आहेत. मित्रांसोबत आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात जादा जवळीक निर्माण होईल.
तूळ- आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल.
वृश्चिक – आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील असे श्रीगणेश सांगतात. लेखन- साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायात प्रतिकूल वातावरण.
धनु – खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल.
मकर – पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. व्यापार वाढीचे योग आहेत. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धनभांडारात वाढ होईल.
कुंभ- सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. माहेरहून अनेक शुभवार्ता येतील.
मीन- आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.