November 30, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- आजचा दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. म्हणून आज कोणताही निर्णय घेऊ नका.

वृषभ – आज मन स्थिर ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत.कारण चंचल मनोदशेमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समझोता करण्याची दृष्टी ठेवलीत तर कोणाशी संघर्ष होणार नाही.

मिथुन – लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. स्वादिष्ट व रूचकर भोजन, वस्त्रालंकार तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया अत्यंत आनंदाचा दिवस.

कर्क – आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका अशी सूचना श्रीगणेश देतात. संबंधित व्यक्तींशी मतभेद होतील.

सिंह – श्रीगणेश आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे सांगतात. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तिमुळे हाती.

कन्या – शुभ फल प्राप्तीचा दिवस. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस फारच चांगला आहे. व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग आहेत.

तूळ- व्यावसायिक क्षेत्रात लाभांचे संभव श्रीगणेश वर्तवितात. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरचे प्रवास किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे बेत ठरवाल.

वृश्चिक – आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवा असा श्रीगणेशांचा तुम्हाला सल्ला आहे. नवीन कामात अपयश येण्याचे योग असल्याने नवीन कामे सुरू करू नका.

धनु – आपला आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल.

मकर – व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभप्रद आहे असे श्रीगणेशांचे म्हणणे आहे. व्यवसायात तुम्ही ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. पैशाच्या देण्या घेण्यातूनही यश मिळेल.

कुंभ- आपले विचार व बोलणे यात बदलाव येईल. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. ध्यान, लेखन व सृजनात्मकता यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उद्भवतील.

मीन- आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल. कुटुंबियांशी वादविवाद न करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शरीर व मन अस्वस्थ असेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *