February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेशजी सांगतात की स्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल.शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मित्र आणि आप्ताच्या भेटी होतील. दुपारनंतर आरोग्य बिघडू शकते. कुटुंबातील व्यक्ति बरोबर मन दुखावण्याचे प्रसंग येतील खाण्या पिण्यावर संयम ठेवा, इतरांशी बोलताना दर्पयुक्त भाषा वापरली जाऊ नये चास्तव जिभेवर नियंत्रण ठेवा, गणेशजींची आपणांस सूचना आहे की कुटुंब, आप्तेष्ट आणि कामाच्या ठिकाणी संबंध चांगले राहावेत या दृष्टिने दिवसातील स्फूर्ति आणि उत्साह यांत संतुलन ठेवा.

वृषभ

दविधा मनःस्थितिमुळे आपण असमाधानी राहाल असे गणेशजी सांगतात सर्दी, खोकला, कफ, ताव यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांचा रियोग जाणवेल.दुपारनंतर काही अनुकूल घडेल. काम- केल्याने उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होईल. आपोष्टांच्या गाढीभेटी ध्याल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील.

मिथुन

आज आपणांस मित्रांकडून लाभ होईल असे गणेशजी सांगतात. भविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. प्रवास आणि सहलीचे नियोजन कराल. सरकारी कामांत फायदा होईल पण दुपारनंतर काळजूपूर्वक राहा असा सल्ला गणेशजी देतात. धर्म, कर्म करण्याने अधिक नुकसान होणार नाही, अशी स्थिति निर्माण होईल. इतरांच्या व्यवहारात पडू नका तसेच पैशाचे व्यवहार करू नका असा सल्ला गणेशजी देत आहेत.

कर्क

गणेशजींच्या मते आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील. संताप जास्त झाल्याने इतरांचे मन दुखावेल. परंतु दुपरानंतर आपल्या तब्बेतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकान्यांशी महत्वाच्या चर्चा होतील.

सिंह

कुटुंबतात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपला दिवस चांगला जाईल असे गणेशजी सांगतात. या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील. कामाचा व्याप वाढल्यामुजे स्वास्थ्य कमी राहील. दुपरानंतर स्वास्थ्य सुधारेल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्यासमवेत प्रवास व सहलीचे बेत आखाल सामाजिक कार्यात भाग घेण्याची इच्छा पूर्ण होईल.

कन्या

गणेशजींच्या मते आज आपले मन गहन विचार व गूढ विदयेकडे आकर्षित होईल. कोणाशी वाद होऊ नये यासाढी विचारपूर्वक बोला. तब्बेत यथातथाच राहील दुपारनंतर प्रवासाचे नियोजन कराल. आज आपला प्रवास भिन्न दिशांना होईल असे दिसते. धार्मिक आणि मंगल कार्याना उपस्थिति लावाल.

तुळ

गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल. आवडला व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. दुपारी आणि संध्याकाळनंतर आपण आपले बोलणे व व्यवहार यांवर संयम ठेवा. शक्यतो प्रवास टाळावा. आध्यात्मिक यश प्राप्तीचे योग आहेत.

वृश्चिक

आजचा दिवस आपण खूप आनंदात घालवाला असे गणेशजी सांगतात. आज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल. त्यापासून लाभ होईल. खूप लोकांची भेट झाल्याने विचारांची देवाण- घेवाण होईल. घरात आणि वैवाहिक जीवनात आनंदाची छटा राहील. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामानुजे स्तुती होईल प्रिय व्यक्तींच्या समवेत प्रेमाचा सुखद अनुभव होईल. वाहनसौख्य मिळेल.

धनू

श्रीगणेशजी सांगतात की आज सकाळी आपणाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामासाठी घानवज होईल. कष्टाच्या मानाने अल्प प्राप्ती होईल. पण दुपारी आणि संध्याकाळनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आप्तेष्टांसमवेत वेज आनंदात जाईल, आपल्या हातून एखादे धार्मिक वा पुण्याचे काम होईल. आर्थिक लाभ होतील. आर्थिक नियोजनही कराल.

मकर

गणेशजींचा आपणाला आज सल्ला आहे की जादा भावनावश किंवा संवेदनशील बनू नका. जलाशय, जमीन आणि मालमत्तेच्या दस्तएवजांपासून दूर राहा. मानसिक तणाव राहील. तब्बेतीकडे लक्ष दया आणि हट्टाने व्यवहार करू नका. अपल्यांची काळजी राहील. शासकीय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या संबंधी असणाज्या विषयांत यश मिळेल. शक्यतो आज प्रवास टाळावा.

कुंभ

गणेशजी सांगतात की आज आपणाला नवीन काम करण्याची प्रेरणा जरूर मिळेल. पण विचारात त्वरित बदल होऊ शकतो म्हणून अंतिम निर्णय घेऊ नका असेही गणेशजी सूचित करतात लेखनकार्यासाठी उत्तम दिवस परंतु दुपारी किंवा संध्याकाळनंतर परिस्थिति बदलून मनात दविधा अवस्था निर्माण होईल. इतरांचे बोलणे किंवा वागणे तुमचे मन दुखावेल. घर व जमिनीसंदर्भातील व्यवहार आज करू नका. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी आपण आध्यात्माचा आधार ध्याल.

मीन

आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. मतभेद आणि तणाव निर्माण करणार्र्या घटना घडू नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबींतही जपून राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. विचार सारखे बदलत राहतील, त्यामुळे मनःस्थिती द्विधा बनेल. निर्णय क्षमतेचा अभाव राहील. बौद्धिक विचारांचा अनुभव येईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click