March 22, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल.पैसाही खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीच्या शुभ वार्ता मिळतील किंवा भेटीचे योग येतील. अचानक धन लाभ संभवतो. प्रवास होतील.

वृषभ

आजचा दिवस शुभफले देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. विशेषतः धंदाव्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. पदोन्नतीचा योगही आहे. कार्यलयात अधिकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीतून आनंद मिळेल.

मिथुन

आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. व्यवसाय क्षेत्रात अधिकारी व सहकारी नकारात्मक वागतील. पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.

कर्क

वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवायापासून दूर राहणेची फायदेशीर होईल.

सिंह

आज पति-पत्नींचे एकमेकांशी पटणार नाही. बेबनाव होईल, त्यामुळे क्लेश होतील असे श्रीगणेश सुचवितात. दोधापैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडे लक्ष द्या. भागीदाराबरोबर सुद्धा मतभेद होऊ शकतात. कोर्ट कचेरीपासून दूरच राहा.

कन्या

व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखाचे असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तुळ

तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा- वादविवाद यात ही तुमचा प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. अजीर्णचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन यात रस वाटेल.

वृश्चिक

मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन आणि किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोपही होणार नाही असे श्रीगणेश सुचवितात.

धनू

प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. मित्रांबरोबर दिवस आनंदात घालवाल. आध्यात्मिक आनंदही आज आपल्या जीवनात भरून राहील. मित्र व स्नेही भेटल्यामुळे आनंदात असाल.

मकर

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग गडतील. व मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. आध्यात्मिकतेतून शांती मिळेल.

कुंभ

श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस तुम्हाला आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. परिवारात आनंदी वातावरण असेल. मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहली यातूनही आज आनंद मिळवू शकता. आध्यात्मिकतेच्या मदतीने विचारातील नकारात्मकता दूर करा असा सल्ला श्रीगणेश देताहेत.

मीन

स्थावर संपत्ती व कोर्ट- कचेरी याच्या झंझट मध्ये आज पडू नका असा सल्ला आज श्रीगणेश तुम्हाला देत आहेत. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. तब्येत सांभाळा. स्वीकायांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायद्यात नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या. देण्या घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click