March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसोबत घालवाल.आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्‍यांकडून लाभ होईल आणि त्यांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्‍या संततीकडून शुभ वार्ता मिळतील. प्रवास- पर्यटनाचे यशस्वी बेत आखाल.

वृषभ

नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. गृहस्थ जीवनात सुख- समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्यजीवनात गोडी राहील. तब्बेत चांगली राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारीवर्गाला येणे- बाकी वसूल करण्यास अनुकूल दिवस आहे.

मिथुन

श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. तब्बेत बिघडेल. त्यामुळे कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार आहे. नोकरी धंद्यात सहकारी आणि उच्च अधिकारी यांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिकदृष्ट्या निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद- विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज तुमच्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीच्या तक्रारी राहतील. अनैतिक काम आणि चोरी सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तींशी भांडण, वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी अध्यात्माचा आधार घ्या असा सल्ला श्रीगणेश देतात.

सिंह

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या- फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीन असेल. जोडीदाराची तब्बेत बिघडेल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी झालेली मुलाखात आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांबरोबर जरा धैर्याने काम करावे लागेल. सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल.

कन्या

श्रीगणेश सांगतात की कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील आणि स्वास्थ्य पण चांगले राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात सफलता आणि यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील आणि व्यापार- धंद्यात प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मातुल घराण्याकडून शुभवार्ता समजतील.

तुळ

आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा यांत भाग घेणे तुम्हाला आवडेल. संततीकडून शुभवार्ता मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तींच्या मिलनाने सुख वाटेल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबरच आज सर्व कामे करील, असे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक

आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक स्वास्थ्य बघडेल आणि मानसिक दृष्ट्या बेचैन राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. कुटुंबातील व्यक्तींशी जुळणार नाही त्यामुळे मन दुःखी राहील. स्थावर संपत्ती आणि वाहन इ. व्यवहाराच्या कागदपत्रावर सही करताना सावध राहा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून भीती राहील.

धनू

श्रीगणेश सांगतात की आज आपणावर गूढ रहस्यवाद आणि अध्यात्म रंग चढेल. म्हणून त्या विषयात खोलवर उतरण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. तब्बेत चांगली राहील आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र आणि नातेवाईक यांच्याशी सुखदायक मुलाखात होईल. भाग्य साथ देईल. व्यापार- धंद्यात प्रगती होईल.

मकर

मौनं सर्वार्थ साधनं’ ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. घरातील व्यक्तींशी मतभेद न होण्याच्यादृष्टीने ही गोष्ट आवश्यक आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका असा श्रीगणेश सल्ला देतात. स्वास्थ्य साधारण राहील. उजव्या डोळ्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.

कुंभ

श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी आजचा दिवस आपणासाठी चांगला ठरेल. कुटुंबीयां समवेत रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल तर दुसरी कडे चिंतनशक्ती व अध्यात्मशक्ती चांगली जाणवेल. दांपत्य जीवनातील गोडीचा आनंद चोखाल. भेटवस्तू आणि धनप्राप्ती होतील. संपूर्ण दिवस प्रसन्नते मध्ये जाईल.

मीन

कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. आपल्या लोकांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा कोर्ट- कचेरीतील प्रकरणे यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी वेळ अनुकूल नाही.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click