March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील.आज आप्त, इष्ट आणइ मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंदयासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान आणइ प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. आग, पाणी आणि दुर्घटना यांपासून सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल.

वृषभ

व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या वार्ता आपणाला भावविवश बनवतील. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. तीर्थयात्रेची शक्यता आहे. कामाचा व्याप थकवा आणि उबग आणेल असे श्रीगणेश सांगतात.

मिथुन

अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबातील व्यक्ती आणि ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंगे येतील. त्यामुळे मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्याने तपासणी किंवा शस्त्रक्रिया आज करू नका. ईश्वर आराधना, जप-जाप्य आणि आध्यात्मिकता आपणाला शांती देईल.

कर्क

आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्न लिंगीय व्यक्तींशी रोमांचक मुलाखात तुम्हाला सुख देईल. दांपत्यजीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. भागीदारीत फायदा होईल. सहलीची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह

श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. अधिकार्‍यां बरोबर वादविवाद करू नका.

कन्या

चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर- सट्टा यांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

तुळ

श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. यात्रा- प्रवासासाठी काळ योग्य नाही. कौटुंबिक आणि जमीन- जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. पाण्यापासून जपून राहा.

वृश्चिक

कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल. जवळपासचा प्रवास होईल. तब्बेत चांगली राहील. श्रीगणेशाचा आपणावर वरदहस्त आहे.

धनू

द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्याकडून येणार्‍या बातम्या किंवा निरोप आपणांस लाभदायक ठरतील.

मकर

ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र आणि आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रसन्न राहाल. नोकरी व्यवसायात पण अनुकूल वातावरण राहील. दांपत्यजीवनात परमानंद लाभेल. घसरणे- पडणे, जखम होणे यांपासून सावध राहा.

कुंभ

कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणाचे भले करण्याच्या नादात आपण संकटात पडणार नाही याची काळजी घ्या. दुर्घटनेपासून जपा.

मीन

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसमवेत सहलीचे बेत आखाल. पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील. अचानक धनलाभ होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click