December 6, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष (Aries) : भाग्य तुमच्यासोबत आहे. मंगळ कार्यात सहभागी व्हाल. मधुर वाणीने दुसऱ्यांना सहजपणे आकर्षित कराल. हुशारीच्या जोरावर तुम्ही कामात यशस्वी व्हाल.

वृषभ (Taurus) :नशीब तुमच्यासोबत आहे. कामात उत्साहीपणा जाणवेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मित्र किंवा ओळखीतल्या व्यक्तीसोबत भेट होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.

मिथुन (Gemini) :भाग्य तुम्हाला साथ देईल. कामात तुम्ही स्वत:ला झोकून द्याल. तुम्ही संभाषणाच्या जोरावर यशस्वी व्हाल. पदोन्नती मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत कराल.

कर्क (Cancer) :मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक परिस्थितीबाबत स्वत: स्थिर असल्याचं जाणवेल. समजदारीने काम केल्यास अडचणीतून सहज बाहेर पडाल. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते.

सिंह (Leo) :तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. सतर्कपणे पैसे खर्च करा. कुटुंबियांना सोबत घेऊन चला. गाडी चालवताना सतर्क राहा.

कन्या (Virgo) : दिवस चांगला जाईल. तुमच्या बुद्धीमत्तेचं आणि कामाप्रती असेलेल्या समर्पणाबाबत अधिकारी वर्ग कौतुक करतील. लहान लहान गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नये. महिलावर्ग घरकामात व्यस्त राहतील. 

तुळ (Libra) : दुसऱ्यांनी तुमच्या मर्जीनुसार वागावं, अशी अपेक्षा सोडन द्या. आपल्या इच्छांचा भडीमार इतरांवर करु नये. शासकीय कामं सहजपणे पूर्ण होतील. वर्तमान स्थितीमुळे व्यवसायावर परिणाम होईल. चांगल्या लोकांसोबत संबंध निर्माण होतील. तुमचं मान-सन्मान वाढेल.

 वृश्चिक (Scorpio) : मन प्रसन्न राहिल. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाचा आनंद घ्याल. कामात फायदा होईल. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल, त्यात यशस्वी व्हाल. 

धनु (Sagittarius) : कामं संथ गतीने मात्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. व्यापारात लाभ होण्याची लक्षणं आहेत. व्यवसायिकांना मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. खरेदी कराल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. सासरकडील लोकांशी भेटाल, त्यांची चौकशी कराल. 

मकर (Capricorn) : आरोग्यात सुधारणा होईल. बहुतांश कामं घरुन करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायिकांसाठी वेळ काहीशी प्रतिकूल असू शकते, मात्र निराश होऊ नये. अधिकारी वर्ग तुमचं काम पाहून कौतुक करतील. सासरकडून आनंदाची बातमी मिळेल.

 कुंभ (Aquarius) : तुमच्या बोलण्याच्या शैलीने अनेक जण प्रभावित होतील. व्यवसायिक जीवनातील स्थिती मनासारखी असेल. काही व्यवहार काही महिन्यांपासून प्रलंबित असल्यास, आजच पूर्ण करुन घ्या. मित्रांना दिलेला शब्द सहजरित्या पूर्ण कराल. 

मीन (Pisces) : दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामात आणि कौटुंबिक आयुष्यात आनंदी वातावरण असेल. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click