January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून दिवस लाभदायी असेल.धनलाभाबरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. तन व मन एकदम ताजेतवाने राहील. आजचा दिवस मित्र आणि नातलगांसोबत आनंदात जाईल. जवळचा प्रवास वा यात्रा घडेल. आज हातून एखादे धार्मिक वा पुण्य कर्म होईल. श्रीगणेश सांगतात की दिवस आपणासाठी शुभ आहे.

वृषभ

वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळतील असे श्रीगणेश सांगतात. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी रहील. शुभकार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. श्रीगणेश सांगतात की आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन

आज आपल्या मनात विविध विचारतरंग उमटतील असे श्रीगणेश सांगतात. त्या विचारांत गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. पण वादविवादात पडू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. संवेदनशील राहाल. आई आणि स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे बनाल. प्रवासाचे योग आहेत तरीही ते टाळण्याचा प्रयत्न करावा. स्त्रिया व तरल पदार्थांबाबात सावध राहा. मानसिक ताण राहील व विचार असमंजस असतील.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. नवीन कार्ये सुरू करायला दिवस चांगला. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसमवेत पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळण्याचे योग आहेत. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

सिंह

आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मैत्रिणी पण मदत करतील. डोळे व दाताच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजनाचे योग आहेत. मधुर वाणीने इतरांची मन जिंकाल. कार्यात यश मिळण्याची शक्यता.

कन्या

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी असेल. विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्ट्या दिवस लाभदायी. तब्बेत चांगली राहील. मन आनंदी असेल. आर्थिक लाभ होतील. सुख व आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.

तुळ

आपण आपल्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अविचारी वर्तन संकटात टाकेल. अशा व्यवहारांपासून जपा. दुर्घटनेपासून सावध राहा. खर्च वाढतील. व्यावसायिक व्यक्तींशी खटके उडतील. वाणीवर संयम ठेवा. वादविवाद टाळा आणि कोर्टकचेरीच्या कामात सावध राहा. नातलगांचे गैरसमज होतील. आध्यात्मिक बाबींमुळे मदत होईल.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. नोकरी व्यवसायात फायदा होईल, मित्रांच्या गाठी पडतील आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व मुलाकडून लाभ होईल. विशेषतः स्त्री वर्गाकडून फायदा होईल. भेटवस्तूचा लाभ संभवतो. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. सांसारिक जीवनात आनंद मिळेल.

धनू

आजच्या शुभ दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आज आपल्यात परोपकाराची भावना राहील. त्यामुळे इतरांना मदत करण्यात आपण उत्साही राहील. व्यापारात योग्य नियोजन राहील. व्यापारानिमित्त बाहेरचा प्रवास करावा लागेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील. बढती मिळण्याची शक्यता आहे.

मकर

आजचा दिवस मध्यम फलदायी राहील असे श्रीगणेश सांगतात. बौद्धिक कार्य आणि लेखन कार्यात आज सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात आणि लेखन कार्यातही आज सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात नवनिर्मितीची योजना आखाल. तरीही मानसिक उदवेगामुळे आपण त्रस्त राहाल. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि आळस जाणवेल. संततीचे शिक्षण तसेच आरोग्य या विषयी काळजी लागून राहील. व्यावसायिक दृष्टीने नवी विचारधारा स्वीकाराल. नाहक खर्चापासून दूर राहा.

कुंभ

अनैतिक, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. तब्बेत बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. इष्टदेवतेची आराधना आपली सर्वातून सुटका करील.

मीन

व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी चांगली वेळ आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल. पार्टी, सहल यांतून मनोरंजन होईल. दांपत्यजीवनाचा भरपूर आनंद मिळेल. वस्त्रे अलंकार, वाहन खरेदी होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click