February 2, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे मन चंचल राहील. त्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण काम पुरे करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल पण नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल.बौद्धिक किंवा तांत्रित चर्चेत तुम्ही भाग घेऊ नका.

वृषभ – आज अगदी स्थिर होऊन काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तसे न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत.

मिथुन – आजचा आपला दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्हाला प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन आणि चांगले कपडे घालायला मिळतील.

कर्क – श्रीगणेश सांगतात की आज आपण खिन्नता आणि भय अनुभवाल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात.

सिंह – श्रीगणेश कृपेने आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्त होईल. मित्रांबरोबर रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठे भाऊ बहिणी यांचा सहवास मिळेल.

कन्या – श्रीगणेश कृपेने आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांची कृपादृष्टी असेल त्यामुळे पदोन्नतीची संधी मिळेल.

तूळ – श्रीगणेश म्हणतात की, आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्यलेखन यात गुंतून राहाल. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. परदेशात राहणार्‍या मित्र आणि सगे सोयरे यांच्या वार्ता समजल्याने तुम्ही प्रसन्न राहाल.

वृश्चिक – आज तुम्ही स्वास्थ्याकडे जास्त लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु – श्रीगणेशांच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांबरोबर चांगला दिवस. स्वादिष्ट भोजन, नवे कपडे प्राप्त होतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींबरोबर आकर्षण वाढेल. त्यांच्याबरोबर रोमांचक भेट होईल.

मकर -आज आपले स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्त होतील. कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती होण्यासाठी दिवस यश देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात.

कुंभ – श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस हा आपला दिवस नाही. वैचारिक दृष्ट्या गर्क राहिल्याने कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय न घेणे हेच बरे. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल.

मीन – श्रीगणेश म्हणतात की आजच्या दिवसात उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्या बरोबर वाद-विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click