मेष (Aries) :
नोकरीत प्रतिष्ठेसह पदोन्नती मिळेल. पदोन्नती किंवा त्यासंबंधित चर्चा होईल. पाल्य प्रशंसनीय काम करतील. मित्र किंवा कुटुंबासह तुमचा प्रवास चांगला होईल
एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल.
वृषभ (Tarus) :
भाग्य तुमच्या सोबत असेल आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. कोणालाही कर्ज देणे टाळा. व्यवसाय आणि पैशासाठी रविवार संमिश्र राहील. पोटासंबंधित समस्या जाणवतील. आहाराबाबत थोडी काळजी घ्या, अन्यथा गॅसची समस्या होऊ शकते.
मिथुन (Gemini) :
सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून शहाणपणाने बोला. तुमच्या जोडीदारासोबत महत्त्वाच्या गोष्टी शेअर करा. रविवारी ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा सन्मान करण्यात आघाडीवर राहाल.
कर्क (Cancer) :
भाग्य तुमच्या सोबत असेल . कुटुंबिय आनंदी असतील. तुम्ही असे कोणतेही काम करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचे नाव उज्जवल होईल. रखडलेले पैसे परत मिळतील आणि पैसे गुंतवले जातील.
सिंह (Leo) :
अनेक लोकांशी संवाद साधाल. चांगले संबंध तयार होतील. कामाच्या ठिकाणी समस्या संभवू शकतात. तुमच्यावर आर्थिक फसवणुकीचे खरे-खोटे आरोप होतील. शांततेने प्रकरण हाताळावे. चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.
कन्या (Virgo) :
आरोग्य उत्तम राहील. इतरांशी सौहार्दपूर्ण वर्तन होईल. परदेश प्रवासाचा आनंद मिळेल. कामानिमित्त दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. पैसा गुंतवण्यासाठी रविवार उत्तम आहे. तुम्ही पॉलिसी, शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवू शकता.
तूळ (Libra) :
हुशारी दाखवून केलेल्या कामात यशस्वी व्हाल. जास्त रागाने त्रास वाढेल. मुलांच्या मदतीमुळे आनंद द्विगुणित होईल. देवाचे ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. शैक्षणिक आघाडीवर सतत प्रयत्नांमुळे, तुम्हाला काही विशेष व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकते.
वृश्चिक (Scorpio) :
वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंब किंवा प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल. तुम्हाला शुभ कार्यात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळेल, ज्यामुळे नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती समाधानकारक राहील.
धनु (Sagittarius) :
घराबाहेर फिरायला जाल, ज्यामुळे तुमचं भरपूर मनोरंजन होईल. कामात तुम्ही तुमचे पूर्ण सहकार्य द्याल. तुम्हाला हवामानाचा फटका सहन करावा लागू शकतो. प्रेम प्रकरणांच्या बाबतीत दिवस अनुकूल आहे.
मकर (Capricorn) :
आरोग्य सामान्य राहील. विचारांचे नियोजन होणार आहे, त्यामुळे कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस चांगला जाईल.
कुंभ (Aquarius) :
भाग्य तुम्हाला साथ देईल. सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. प्रगतीसाठी कठोर परिश्रम कराल. कामात लाभदायक परिस्थिती राहील. उत्स्फूर्तपणे नफा मिळण्याची शक्यता असू शकते, म्हणून जोखीम घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु ध्येयाबद्दल फारसे गांभीर्य राहणार नाही.
मीन (Pisces) :
जुन्या प्रकरणावरुन सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक काम करुन वाद टाळा. वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास बरं होईल. लॉटरी आणि शेअर मार्केट च्या व्यवसायात मोठा लाभ मिळू शकतो. पैशाची आवक चांगली राहील.