November 30, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज स्वतःचे खाजगी विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करा असे श्रीगणेश सांगतात.घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल. वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतील. वेळेवर जेवणही मिळणार नाही. नाहक खर्च टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक बाबतीत सावध राहा.

वृषभ

श्रीगणेश म्हणतात की आज आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. उत्साही मन आणि स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवाल.

मिथुन

उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आवेश आणि उग्रपणा यांमुळे कोणाशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या. तब्बेत चांगली राहणार नाही. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. अपघाताचे ग्रहमान आहे. कुटुंबातील व्यक्तींशी भांडण होईल. जमा कमी आणि खर्च जास्त होईल. मन:शांती केवळ ईश्वरध्यान आणि अध्यात्मामुळे मिळेल.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. अविवाहितांना विवाहयोग आहेत. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आर्थिक योजना यशस्वीरीत्या पूर्ण होतील. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.

सिंह

आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्‍यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील. दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी प्रेमपूर्ण संबंध राहतील आणि त्यांच्याकडून लाभ होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

कन्या

आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल असे श्रीगणेश सांगतात. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील. नोकरी व व्यवसायात सहकारी व अधिकारी नकारात्मक वागतील. संततीविषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

तुळ

कोणाशी वादविवाद किंवा भांडण न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहा. तब्बेतीकडे लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल. गूढ विद्या आणि रहस्यमय विषय यांचे आकर्षण राहील. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांती मिळेल.

वृश्चिक

आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल.

धनू

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस अनुकूल आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण. सहकार्य मिळेल. माहेरहून सुवार्ता येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

मकर

शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना तुमचे काम आवडणार नाही. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. संततीच्या तब्बेतीच्या तक्रारी राहतील.

कुंभ

स्वभावातील हट्टीपणा सोडण्याची सूचना श्रीगणेश देतात. भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या. घर आणि संपत्ती संबंधित कामे आज जपून करावीत. आईकडून लाभ होईल. विद्यार्जनास अनुकूल दिवस. आर्थिक नियोजनास चांगला.

मीन

महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल. मित्रांसोबत प्रवास- पर्यटन कराल. भावंडांशी जवळीक वाढेल. सामाजिक मान- सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *