January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे.सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न असाल. आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल. मित्र आणि सगे सोयरे यांना भेटून घरातील वातावरण आनंदमय राहील. उत्तम कपडे व भोजन प्राप्त होईल. मित्र आणि शुभेच्छुक यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. त्यामुळे आनंदी असाल.

वृषभ

आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही आणि कुटुंबीय यांच्याशी मतभेद झाल्याने तुम्ही दुःखी असाल. तुम्ही सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने मन निराश होईल. अविचाराने घेतलेल्या निर्णयाने गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन

आपला आजचा दिवस विविध लाभ प्राप्त करून देणारा ठरेल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात पत्नी आणि मुलांकडून फायदयाच्या बातम्या कळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या मिळकतीत भर पडेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. विवाहोत्सुकांना जोडीदार मिळेल. स्त्री मित्रांकडून लाभ संभवतो. आनंददायी प्रवास ठरतील. स्वास्थ्य चांगले राहील.

कर्क

नोकरी व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायक आहे असे श्रीगणेश म्हणतात. नोकरीत पदाधिकारी तुमच्यावर खूश असतील त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांबरोबर महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा कराल. मन ताजे तवाने राहील. मातेबरोबर चांगले संबंध राहतील. धन- मान- सन्मान मिळेल. गृहसजावटीत रस घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकार कडून फायदा व संसारिक सुखात वाढ होईल.

सिंह

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फल देणारा जाईल. धार्मिक आणि मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. धार्मिक प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्‍या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठाबरोबर सावधानीपूर्वक व्यवहार करा. नोकरी धंद्यात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस व विमनस्कता जाणवेल.

कन्या

आज नवीन कामे सुरू न करण्याचे श्रीगणेश सांगतात. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट बनेल. म्हणून बोलण्यावर ताबा ठेवा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर मतभेद संभवतात. पाण्यापासून जपा. महत्त्वपूर्ण निर्णय किंवा जोखिम यापासून वाचण्यासाठी विल, विरासत या संबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. कष्टाचे उचित फळ न मिळाल्याने मन उदास होईल. हितशत्रूंपासून सांभाळून राहा. गूढ, रहस्यमय गोष्टीत रूची राहील.

तुळ

आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा व आनंदाचा असेल ज्यामुळे पूर्ण दिवस आनंदच अनुभवाल. सार्वजनिक जीवनासंबंधीच्या कार्यात सफलता मिळवाल. भिन्नलिंगी व्यक्तीचा आज तुमच्यावर प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल. नवीन वस्त्र अलंकार खरेदी कराल. ते वापरण्यासाठी संधीही मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम भोजन व वैवाहिक सुख मिळेल. प्रणयप्रसंगांसाठी शुभ दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक

आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाकाती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुल घराकडून काही बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून सांभाळून राहण्याचे श्रीगणेश सांगतात. आय कमी आणि व्यय जास्त अशी स्थिती राहील. नवीन कामाची सुरूवात करू नका.

धनू

श्रीगणेश आजचा मिश्रफलदायी दिवस असल्याचे सांगतात. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य आणि अभ्यास यामुळे चिंतित राहाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्‍या रागावर नियंत्रण ठेवा. प्रणयासाठी मात्र योग्य वेळ आहे. प्रिय व्यक्ती बरोबर रोमांचक क्षण अनुभवा. साहित्य आणि लेखन क्षेत्रात रस राहील. बोलाचाली तसेच बौद्धिक चर्चा यापासून दूर राहा, तेच हिताचे असेल.

मकर

श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे, त्यामुळे मन खिन्न राहील. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणे संभवते. स्त्रिया बरोबर काम करताना सांभाळून राहा असा सल्ला श्रीगणेश देतात.

कुंभ

आज आपण तना-मनाने प्रसन्न असाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदा बरोबर एकत्र येऊन नवीन योजना ठरवाल. त्यांच्या बरोबर आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र आणि स्वजना बरोबरच्या भेटीने तुमचे मन आनंदी राहील. कार्यक्षेत्रात कौशल्याने चांगले यश मिळवाल.

मीन

श्रीगणेश आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायला सांगतात. रागामुळे कोणाशी तक्रार किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील सदस्य आणि प्रियजन यांच्याकडून घरात विरोधी वातावरण राहील. चुकीचे खर्च होतील. नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या मनावर वाढणार नाही याची काळजी घ्या. खाण्या- पिण्यावर संयम ठेवा. सामान्यपणे आज समजून उमजून चालण्याचा दिवस आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click