August 9, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

कमी वेळात अधिक लाभ’ या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या.कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. कोणाला जामीन राहू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. तब्बेतही सांभाळा. पैशाच्या देवाण- घेवाणीत लक्ष द्या. दुर्घटनेपासून जपा. दुपारनंतर मात्र खूप खुशीत राहाल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. धार्मिक कार्य तसेच प्रवास घडतील. नवीन काम आज हाती घ्याल. अचानक धनलाभ होईल.

वृषभ

घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील असे श्रीगणेश सांगतात. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. नवीन मित्र पण मिळतील. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपारनंतर सांभाळून राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगा. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. कोर्ट- कचेरी प्रकरणे सांभाळून हताळा.

मिथुन

आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील आणि वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. अचानक धनलाभाची शक्यता.

कर्क

वरिष्ठ अधिकार्‍यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा, असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामामुळे संतुष्ट राहतील. आर्थिक दृष्ट्या लाभ होईल.

सिंह

आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील. घरातील व्यक्तींशी भांडणे होतील. ईष्टदेवता स्मरण आणि आध्यात्मिकतेचे आचरण हाच त्यावर तोडगा आहे. उच्च पदस्थ आणि प्रतिस्पर्ध्यांबरोबर शक्यतो वादविवाद करू नका. नकारात्मक विराचांपासून दूर राहा.

कन्या

सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. तब्बेतीचा त्रास होईल. विशिष्ट आजारावर अचानक खर्च करावा लागेल. त्याच बरोबर अचानक धनलाभ आपली काळजी दूर करेल.

तुळ

आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. गृहस्थी जीवनात सुख- शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर ताबा ठेवा. दुपारनंतर आपली स्थिती पालटेल आणि आपण मनोरंजनाचा विचार कराल. मित्रांसोबत पर्यटनाचे योग आहेत. शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वास्थ्य लाभेल.

वृश्चिक

मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल राखण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती यांत नावीन्य मिळेल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. व्यवसायात सफल व्हाल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

धनू

कुटुंबातील शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद- विवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. स्नेहयांशी जवळीक वाढेल.

मकर

महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपारनंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ राहील. शारीरिक दृष्ट्या स्फूर्ती वाटणार नाही. धन आणि प्रसिद्धिची हानी होईल. स्थावर संपत्तीचे व्यवहार करताना सावध राहा. आईच्या तब्बेतीची काळजी लागेल.

कुंभ

आज राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थिरता येईल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस न्याल. रचनात्मक व सृजनशील क्षेत्रात मान- सन्मान मिळेल.

मीन

आजचा आपला दिवस शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवासाचे योग आहेत. दुपारनंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीच्या व्यवहारांत सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक दृष्ट्या अधिक स्वास्थ्य लाभेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click