April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्याचा अनुभव येईल.सर्दी, खोकला, ताप इ. चा त्रास होईल. धर्मार्थ काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इ. कागदपत्रांविषयी फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची तब्बेत बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत राहिल्यामुळे द्विधा अवस्थेत अडकाल. कोणाला जामीन न राहण्याविषयी श्रीगणेश सावधानतेची सूचना देत आहेत.

वृषभ

श्रीगणेश सांगतात की आज आपली आवक आणि व्यापार यांत वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसोबत हसण्या- खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास- पर्यटनाचे योग आहेत. आज खासकरून महिला वर्गाकडून लाभ होतील. जीवनसाथीदारा बरोबरचे संबंध प्रगल्भ आपलेपणाचे अनुभव देतील. भावंडांकडून आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

मिथुन

आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने प्रसन्न वाटेल. मान- सन्मान वाढतील. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. गृहस्थीजीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. श्रीगणेश सांगतात की सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील आणि मार्ग मोकळा होईल.

कर्क

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुवार्ता येतील. धार्मिक कार्य, देवदर्शन, यात्राधाम यामुळे आनंदात भर पडेल. परिवारातील व्यक्तींबरोबर चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता श्रीगणेशाना वाटते.

सिंह

आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष पुरविण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग आणि बोलणे यांवर ताबा ठेवावा लागेल. घरातील सदस्यांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या- पिण्यामुळे तब्बेत बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. अनैतिक कामात कोठेही सहभागी न होण्याविषयी दक्ष राहा. अशा वेळी अध्यात्मच मनाला दिलासा देईल.

कन्या

सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी पण मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्यजीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी कराल आणि ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे, असे श्रीगणेश सांगतात. प्रवास पर्यटनाचे योग आहेत.

तुळ

श्रीगणेशांच्या मते नोकरदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत यश आणि सफलता मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या वार्ता मिळतील. तब्बेत चांगली राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. वित्त योजना बनविण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. परिश्रम प्रगतिपथावर नेतील. संतती विषयक शुभवार्ता समजतील. भिन्न लिंगीय व्यक्तींचे आकर्षण राहील.

वृश्चिक

आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. तसेच माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळांबलेली कामे मार्गी लागतील असे श्रीगणेशांचे मानणे आहे.

धनू

आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह यांचा अभाव राहील असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात क्लेश आणि कलहजन्य वातावरण राहील. त्यामुळे मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची तब्बेत बिघडेल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. धनहानी होईल. स्त्रीवर्गा कडून हानी संभवते. नदी, तलाव, समुद्र अशा जलाशयांपासून सांभाळून राहा.

मकर

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार धंद्यात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. भावंडांसमवेत वेळ खूप चांगला जाईल. एखादे नवे कार्य सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. मित्र आणि आप्त यांच्या भेटीने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ

श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. परिणामतः उलघाल होईल. तब्बेत पण साथ देणार नाही. वाणीवर ताबा राहणार नाही. त्यामुळे वादविवाद होतील आणि आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च आणि धनहानी होण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी उद्भवतील.

मीन

आज आपणाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र आणि घरचे लोक यांच्यासमवेत भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. यात्रेचे योग आहेत. लक्ष्मीची कृपा होईल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. दांपत्यजीवनात सुख प्राप्ती होईल. कुटुंबात शांततेचे वातावरण पसरेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click