December 6, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – अत्यंत सावधपणे आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. सर्दी, खोकला आणि ताप यामुळे तब्बेत बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. दानधर्म करण्यात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल.सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील.

वृषभ – आज आपणावर श्रीगणेशाची पूर्ण कृपा राहील. परिवारात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात आणि व्यापार धंद्यात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल.

मिथुन – श्रीगणेश कृपेने आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रोत्साहन मिळेल. बढतीचा योग आहे. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल.

कर्क – आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. भाग्योदयाची संधी मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल.

सिंह –श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे. तब्बेतीकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. आण

कन्या – श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील. जीवनसाथी बरोबर जवळीकेच्या क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्यजीवनात गोडी राहील. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान- प्रतिष्ठा वाढेल.

तूळ – घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश आणि सफलता मिळेल. तब्बेत चांगली राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. मातुल घराण्याकडून वार्ता येतील.

वृश्चिक – तब्बेती विषयी थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर- सट्टायात न पडण्याची सूचना श्रीगणेश देतात. शक्यतो यात्रा, प्रवास यात जपून राहा.

धनु – शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या तब्बेतीसंबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्ट्या आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या.

मकर – दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. गृहस्थी जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार- धंद्यात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात.

कुंभ – वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल.

मीन – आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे. नातलग, संबंधित आणि मित्र यांच्याशी भेट- संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. आणखी वाचा

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click