March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत.अन्यथा आळस आणि दुःख वाढेल. तब्बेत यथा-तथाच राहील. कार्ये व्यवस्थित पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन चांगले कराल. व्यापाराच्या उद्देशाने बाहेर पडावे लागेल. इतरांना मदत करण्याचा प्रयत्न आपण कराल असे गणेशजी सांगतात.

वृषभ

सरकार विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. नवे कार्य हाती घेऊ नका. तब्बेत बिघडेल. मनातही काळजी राहील. उक्ती आणि कृती यात संगती ठेवा. व्यवसायात अडचणी उद्भवतील. दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठापासून जपून राहा. संततीविषयक काळजी राहील.

मिथुन

आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र आणि संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवा. तब्बेत सांभाळा.

कर्क

खूप मोठया आर्थिक लाभाची प्राप्ती होईल असे गणेशजी सांगत आहेत. व्यावसायिकांना दिवस लाभप्रद. कार्य साफल्यामुळे बढती आणि यशाची प्राप्ती होईल. दुपारनंतर मनोरंजनाच्या हेतूने अन्यत्र जाण्याची संधी मिळेल. मित्रांसमवेत प्रवास- सहली तसेच स्वादिष्ट भोजनाची संधी प्राप्त होईल. व्यापार- धंदयात भागीदारांबरोबर फलदायी विचार विनिमय होईल.

सिंह

साहित्य आणि कलेविषयी गोडी वाटेल असे गणेशजी सांगतात. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थ राहाल. दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. तब्बेत चांगली राहील. धंदा- व्यवसायात लाभ होईल.

कन्या

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्याकडे लक्ष द्या असा गणेशजींचा सल्ला आहे. आईची तब्बेत बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानीचे योग आहेत. पाण्यापासून जपून राहा. यात्रा प्रवास टाळा. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंता राहील. रागावर संयम ठेवा. आसपासच्या बौद्धिक चर्चेपासून अलिप्त राहा.

तुळ

श्रीगणेश असा संकेत देतात की आजचा दिवस नवकार्य प्रारंभास अनुकूल आहे. आध्यात्म आणि गूढ रहस्यांकडे आकर्षण राहील. दुपारनंतर मात्र आनंद आणि उत्साहाचा अभाव राहील. घरात क्लेश वाढतील. सर्वांसमोर अपमान होणार नाही याचे भान ठेवा.

वृश्चिक

गणेशजी म्हणतात की कुटुंबातील व्यक्तींशी मने दुखावण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मन द्विधा असेल. कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर मात्र मनातील मरगळ दूर होऊन मन आनंदी व प्रसन्न होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्य उजळेल.

धनू

आज आपणाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत गणेशजी देतात. कोणा स्नेह्याकडे मंगल कार्यानिमित्त जावे लागेल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपारनंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. कृत कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने निराशा होईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती नाही.

मकर

कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अस्वस्थ मन, शरीर- प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष दया. बोलणे आणि व्यवहार संयमाने करा. वाहन जपून चालवा. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल. मन प्रसन्न बनेल. घरातील वातावरण चांगले राहील. धर्म व दयाभावना वाढीस लागेल. हातून परोपकार वा एखादे सत्कार्य घडेल.

कुंभ

आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. अपरिचितांशी परिचय होतील. परंतु दुपारनंतर तब्बेत बिघडेल. परिवारात मनस्तापामुळे वातावरण दूषित होईल. पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामांत जपून वागा. स्वभाव तीव्र आणि संतापी होईल. म्हणून व्यवहार जपून करा.

मीन

आज आपले विचार ठाम व पक्के नसतील असे गणेशजी सांगतात. वरिष्ठांकडून व्यवसायात लाभ होतील. पदोन्नती मिळेल. व्यापारविषयक नियोजन कराल. कुटुंबात सुखसमाधान नांदेल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरही लाभ मिळतील. मित्रांसमवेत रम्य स्थळी जाण्याचे नियोजन कराल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click