March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश सांगतात की आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल.उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीत राग येईल. त्यामुळे कामात बिघाड होईल. नोकरी, व्यापाराच्या जागी किंवा घरात आपणामुळे दुःख होणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक किंवा मंगल कार्यासाठी जावे लागेल.

वृषभ

आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला देतात. खाण्या- पिण्यावर विशेष लक्ष द्या. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. शक्य असेल तर प्रवास टाळा. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. योग, ध्यानामुळे मानसिक शांतता मिळू शकेल.

मिथुन

श्रीगणेशांच्या मते आज आपण मनोरंजन आणि आनंदात मग्न राहाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक दृष्टया सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल.

कर्क

श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आनंदाचा आणि यशदायक असेल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. महत्त्वाच्या कामावर खर्च होईल. तरीही आर्थिक लाभ होतील असे योग आहेत. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.

सिंह

आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश म्हणतात. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल संततीकडून आनंददायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांची भेट आनंद देईल. धार्मिक परोपकाराचे कार्य हातून घडेल.

कन्या

आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील व्यक्तींबरोबर विचार जुळणार नाहीत. आईची तब्बेत बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. पैसा खर्च होईल.

तुळ

आज भाग्योदय होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. भावा- बहिणींशी चांगले संबंध राहतील. धार्मिक यात्रेचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास शुभ दिवस आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. परदेशातून आनंदाच्या वार्ता येतील. हितशत्रूंवर विजय मिळवाल. सन्मान प्राप्ती होईल.

वृश्चिक

आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाणीवर ताबा ठेवा. त्यामुळे कुटुंबात सुख- शांति राहील. विचारांवर नकारात्मक पगडा पडेल. तो दूर करा. धार्मिक कामांसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी काळ फारसा अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात.

धनू

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष द्या. ठरलेली कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे. नातेवाईकाकडे एखाद्या मंगल कार्यासाठी उपस्थीत राहाल. स्वकीयांना भेटून आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. रुचकर भोजन मिळेल. सामाजिक क्षेत्रात यशकीर्ती मिळेल.

मकर

आज सावधान राहण्याविषयी श्रीगणेश सांगत आहेत. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्च वाढेल. धार्मिक व सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्याविषयी चिंता राहील. मुलगा आणि नातेवाईक यांच्याशी पटणार नाही. कष्ट करूनच यश मिळेल. मन व्याकूळ होईल. दुर्घटने पासून सावध राहा.

कुंभ

नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी धंद्यात फायदा होऊ शकतो. स्त्रीयांकडून कामे होऊ शकतात. आज आपल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी आहे. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संतती बरोबर चांगले जमेल. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून आनंदाची बातमी कळेल. विवाहोत्सुकांसाठी विवाहाचे योग येतील. आपण सहलीची योजना ठरवाल.

मीन

श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. नोकरी व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील. त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वयस्कर आणि वडील यांचेकडून लाभ होईल. कौटुंबिक आनंदामुळे आपण आनंदी राहाल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click