November 30, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष राशीतील चंद्र , शुक्र बुधाशी प्रतियोग करीत आहे.मंगळ रोग स्थानात असून प्रकृती नाजूक राहील. आर्थिक स्थिती उत्तम व्यवसायातून मोठे लाभ. दिवस शुभ.

वृषभ व्यय स्थानातील चंद्र खर्चात वाढ करेल.संतती कडे लक्ष असू द्या. शुक्र बुध व्यवसायात वाढ करतील. दशमातील शनि गुरू कार्यक्षेत्रात अनेक संधी मिळवुन देतील. छोटे मोठे प्रवास योग आहेत.दिवस शुभ.

मिथुन आनंद देणारा प्रवास, मौजमजेसाठी खर्च. मित्रांचा सहवास असा हा दिवस शुभ असुन यश मिळवून देईल. गृहसौख्य मिळेल.घरात काही वाद होऊ देऊ नका. दिवस शुभ.

कर्क दशम स्थानात चंद्र शुक्राच्या दृष्टीत असून नोकरी पेशा व्यक्तींना अतिशय शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस शुभ.

सिंह भाग्य कारक घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल धन प्राप्तीचे योग येतील .पण खर्च देखील वाढेल.भावंडाची प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. दिवस शुभ.

कन्या अष्टमात चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य कमी राहील.उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. थकवा जाणवेल. आर्थिक बाजू उत्तम असली तरी खर्च जपून करा. दिवस मध्यम आहे.

तुला जोडीदाराला वेळ द्या. राशीतील शुक्र बुध घरांमधे काही चांगली घटना घडेल. आर्थिक लाभ होतील.खर्च बेताने करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.दिवस चांगला जाईल.

वृश्चिक षष्ठ चंद्र आज प्रकृती जरा नरम ठेवेल. शरीर शिथिल, मन अस्वस्थ राहील. आर्थिक स्थिती सांभाळा.आवाका पाहून खर्च करणे योग्य राहील. दिवस मध्यम.

धनु आज संतती साठी थोडी चिंता वाटेल. शैक्षणिक बाजू चांगली राहील.त्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. तृतीय गुरू शनि पराक्रमाची वाढ करतील. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला .

मकर राशीच्या चतुर्थ स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल असून नैमित्तिक कामे नीट पार पडतील.नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर राहणार आहे. दिवस शांततेत घालवा.

कुंभ आज तृतीय स्थानात येणारा चंद्र मौजमजेसाठी प्रवास योग आणेल. बहिण भावाच्या भेटीचा योग.किंवा महत्त्वाचे फोन येतील. प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल.

मीन आर्थिक लाभ, कौटुंबिक कारणांसाठी खरेदी, प्रवास, असा हा दिवस अतिशय आनंदात जाईल.दोघांनी मिळून काम पार पाडावे. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. दिवस शुभ.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *