November 30, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेशाच्या कृपेने दिवस शुभ राहील.स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. वडीलधारे आणि स्नेहीयांच्याशी संपर्क होईल आणि त्यांच्याशी व्यवहार वाढतील रम्य स्थळी सहलीचा लाभ होईल. अचानक धनलाभ तसेच संततीकडून लाभ होईल.

वृषभ

श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला चांगला जाईल. नवीन कामाच्या योजना आखाल. नोकरदार आणि व्यावसायिकांना दिवस चांगला जाईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होईल. घरात वर्चस्व राहील आणि आपलेपणा वाढेल. भेटवस्तू आणि मानसम्मान मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

मिथुन

मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील असे श्रीगणेशांना वाटते. शरीराने थकाल आणि आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ करू नका. प्रतिस्पर्ध्यांशी गहन चर्चा करू नका.

कर्क

श्रीगणेशांच्या मते प्रतिकूल परिस्थितीचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून श्रीगणेश सावध राहण्याची सूचना देत आहेत. सरकारी कामात विघ्ने येतील. कुटुंबात भांडणे होणार नाहीत याची काळजी घ्या. मानसिक अस्वास्थ्य राहील.

सिंह

मध्यमफलदायी दिवस. धंदा व्यवसायात मतभेद राहतील. तुमची तब्बेत चांगली राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्या मुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. भिन्न लिंगीय व्यक्तींची भेट होईल. त्यात सावध राहण्याचा श्रीगणेश सल्ला देतात.

कन्या

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. घरात सुख शांतीचे वातावरण पसरेल. त्यामुळे मनही प्रसन्न राहील. सुखद प्रसंग घडतील. तब्बेत चांगली राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. माहेरहून आनंदी वार्ता येतील.

तुळ

आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. असे गणेशजींना वाटते. अपत्यांकडून शुभ समाचार मिळतील. तुमची प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल. उत्साह आणि आनंदी मन यांचा अभाव राहील. मनात विचारांचे काहूर उठेल व मन विचलित करेल.

वृश्चिक

आजचा दिवस शांततेत घालवा असे श्रीगणेश सुचवतात कारण मन चिंतीत राहील व संबंधीतांशी पटणार नाही. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. स्त्रिया व वाणी यापासून भय संभवते. श्रीगणेशजी सांगतात की दस्तऐवजाच्या कार्यवाही बाबत विशेष काळजी घ्या.

धनू

गूढविद्या आणि अध्यात्मिकता यात तुम्ही आज मग्न राहाल. भावंडांबरोबर चांगले वर्तन राहील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगली वेळ आहे. मित्रमंडळींशी बोलणे होईल. कामात यश मिळेल. तसेच प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. लहान प्रवास घडतील. भाग्यवृद्धी बरोबरच समाजात मान- सम्मान मिळेल असे श्रीगणेश सांगतात.

मकर

आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी यात पैसा अडकवाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. शारीरिक आरोग्य मध्यम. डोळ्यांचे त्रास. नकारात्मक विचारांवर पूर्णतः संयम ठेवा असे श्रीगणेश सागतात. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे.

कुंभ

गणेशांच्या सांगण्यानुसार आज तुमचे शरीर आणि मन उत्साही असेल. दिवस लाभदायक आहे. मित्र- कुटुंबियांसमवेत एखाद्या सहलीला जाल. अध्यात्म आणि चिंतन यात प्रगती राहील. मित्र- आप्तेष्ट यांच्याकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. नकारात्मक विचारापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

मीन

श्रीगणेश सांगतात की आज मन अशांत राहील त्यामुळे एकाग्रता कमी असेल. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. पैसा गुंतवणूकीकडे आज जास्त लक्ष द्या. स्वजनापासून आज तुम्ही दुरच राहा कारण त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. एखादया लहानशा फायद्यासाठी मोठे नुकसान होणार नाही याकडे लक्ष ठेवा. कोर्टाची कामे काळजीपूर्वक करा. आध्यात्मिक कार्यात सगळा दिवस जाईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *