मेष चंद्राचे लाभ स्थानावरून भ्रमण फायदेशीर ठरेल.उच्चीचा शुक्र नवी खरेदी करेल.संतती चिंता कमी होईल. गुरू शनि शुभ योगाची फळे मिळतील. अध्यात्मिक साधना सफल होईल. दिवस शुभ.
वृषभ आज दिवस कार्यक्षेत्रात चांगलं फळ घेऊन येणार आहे. या आठवड्यात मंगळाचे स्वामित्व तुमच्या संतती आणि शिक्षण यावर राहिल. त्यादृष्टीने काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा.खर्च वाढणार आहे. दिवस चांगला आहे .
मिथुन आज राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र अतिशय शुभ फळ देणारा ठरेल. प्रवास, धार्मिक कार्य घडेल.कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
कर्क काही कारणाने आज तुमचा दिवस कटकटीचा जाण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान किंवा खर्च, शारीरिक त्रास संभवतात.मात्र नामजप, साधना करण्यासाठी फार शुभ दिवस आहे.
सिंह शुक्र आणि चंद्र प्रभाव क्षेत्रातून आजचा दिवस जोडीदाराला शुभ फळ देणारा ठरेल. व्यवसाय उद्योगात काही नवीन घटना घडतील. धनलाभ होईल.दिवस चांगला जाईल.
कन्या आज दिवस पुन्हा गडबडीत जाईल. थकवा जाणवेल. पण षष्ठ स्थानातील चंद्र नोकरदार व्यक्तींना उत्तम फळ देतील.आई कडील नातेवाईक भेटतील. खर्च बेताने करा. दिवस शुभ.
तुला पंचमात चंद्र उत्तम संतती सुख देणार आहेत.आध्यात्मिक प्रगती होईल. शिक्षण, परीक्षा याकरता शुभ काल. तुमचा नावलौकिक वाढेल. दिवस उत्तम आहे.
वृश्चिक घर आणि कुटुंबीय यासाठी आजचा दिवस सत्कारणी लागेल. गुरू आणि चंद्र शुभ असून घरासाठी उत्तम खरेदी होईल. मंगळ तुमच्या ऊर्जेचा वापर करून घेईल. नाव मिळेल.दिवस शुभ.
धनु तृतीय चंद्र आणि दशमातील मंगळ रवी शुभ संकेत देत आहेत. गुरुकृपा होईल. धार्मिक कार्य घडेल.कौटुंबिक सुख, वडिलांकडून लाभ, मौजमजेसाठी प्रवास असा हा दिवस शुभ फळ देईल.
मकर आज द्वितीय स्थानातील चंद्र अतिशय शुभ फळ देणारा असून आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. मात्र भाग्य स्थानात रवी मंगळ आहे हे विसरू नका.दिवस शुभ आहे.
कुंभ राशीतील चंद्र सात्त्विक प्रवृत्ती वाढीस लागतील. गुरुकृपा राहील. आर्थिक लाभ होतील.नवीन काही सुरू करण्यास दिवस शुभ आहे. आयुष्याचा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला.
मीन काही कारणांसाठी भटकंती खर्च, खरेदी, व्यय असा हा दिवस व्यस्त जाईल.प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तृतीय स्थानातील राहू वारंवार फिरती दाखवत आहे. दिवस मध्यम. शुभम भवतु!!