April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात.व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल. पत्नीच्या आरोग्या विषयी काळजी राहील.

वृषभ

आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आळस आणि व्यग्र असल्याने तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका. अग्नी, पाणी आणि अचानक उदभवणारी संकटे यांपासून सावध राहा असे गणेशजी सांगतात. व्यापारात पैशाच्या देवाण- घेवाणी साठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. व्यवसायात बढतीचे योग. मुलाबाळांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. गृहजीवन आनंदी राहील.

मिथुन

नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा. अचानक खर्च उदभवतील. काही कामास्तव बाहेरचा प्रवास घडेल. दुपारनंतर बौद्धिक व साहित्यिक विचार कमकुवत राहतील. मानसिक दृष्टया बेचैन राहाल. संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष दया.

कर्क

गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होण्याचे योग आहेत. विचार अनिर्णित व भरकटत राहतील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद वाढतील. नोकरी धंद्यात परिस्थिती अनुकूल राहील. रागावर ताबा ठेवा. नवीन कामे सुरू करू नका.

सिंह

आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. परदेशात स्थिती व्यावसायिकांकडून लाभ होण्याची शक्यता. धनवृद्धिमुळे हात सैल सुटेल. घबाडयोग आहेत. तरीही विचार डळमळीत राहील. प्रवास घडतील. पैसा अचानक खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवा. नवे काम आज हाती घेऊ नका.

कन्या

आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. कलेत आवड राहील. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद आणि शांतता लाभेल. तब्बेत चांगली राहील. व्यवसायात वातावरण चांगले राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.

तुळ

आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. शरीरात उत्साह आणि मनात आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. नोकरी व्यवसायात अपमानीत होणार नाही याकडे लक्ष द्या. दुपारनंतर आपल्या शारीरिक तसेच मानसिक स्थितीत सुधारणा होईल. स्वभावात कलात्मकता व सृजनात्मकता दिसेल.

वृश्चिक

आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊबंदांचे वर्तन सहकार्यपूर्ण राहील. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. परंतु दुपारनंतर दिवस प्रतिकूल जाईल. नोकरी व्यवसायात अपयश मिळण्याची संभावना आहे. कुटुंबियांवर एखादा दुःखद प्रसंग येण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या वेळा चुकतील. झोपही वेळेवर येणार नाही. धनहानी संभवते.

धनू

आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. आरोग्य ठीक राहील. अध्यात्मासाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दयावे. दुपारनंतर अनुकूलता जाणवेल. मनाची जी द्विधा झाली होती, त्याचे निराकरण होईल. शरीर आणि मन दोन्हीही स्वस्थ राहील हितशत्रू पराभूत होतील.

मकर

आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात. उदयोग व्यवसायात अनुकूल वातावरण. सगळी कामे सहज पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. परंतु दुपारनंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळे निराशा वाढेल. शेअर्स व सट्टयात पैसे गुंतवाल.

कुंभ

धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल. अपघात किंवा शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा. दुपारनंतर सगळेकाही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. अधिकारी वर्गाची आपल्यावर कृपादृष्टि राहील. त्यामुळे मनाला शांती मिळेल.

मीन

व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. प्रवास घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपारनंतर मात्र प्रत्येक काम खबरदारीने करावे. व्यवसाय धंद्यावर सरकारी प्रभाव वाढेल. खूप कष्ट करूनही प्राप्ती कमी होईल. अध्यात्मिकतेकडे कल राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click