October 5, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष
रविवारचा दिवस पूर्ण ऊर्जेनं भरलेला राहणार आहे. मंगलकार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न असणार आहे. कामात मेहनत केली तर फळ नक्की मिळणार आहे.
कुटुंबाकडून योग्य सहयोहग मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ
उत्साहाने भरलेला रविवारचा दिवस असणार आहे. भाग्य साथ देईल. कामाच्या ठिकाणी जोश पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये सफलता मिळेल. ओळखीच्या लोकांशी भेटीगाठीचा योग आहे. कामकाजात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. दिवसभर व्यस्त राहाल.

मिथुन
मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत काही वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. व्यवसायाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने असतील. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क
कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. कोणताही नवीन व्यवसाय करायचा विचार मनात येईल. आज आपलं भाग्य साथ देईल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. समाज आणि कौटुंबिक दोन्ही क्षेत्रांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल.

सिंह
दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामाच्या ठिकाणी असो किंवा कुटुंबात आज आपल्याला सुख मिळणार आहे. व्यापारी वर्गाला विशेष फायदा होऊ शकतो. अधिक काळासाठी याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत.

कन्या
कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. आज आपल्याला मेहनत आणि समजुदारीनं काम घ्यावं लागेल मात्र तसं केल्यानं फायदाच होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. एखादी शुभवार्ता मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. तणाव संपेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ
रविवार तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. हजरजबाबीपणा बाळगावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्तुती होईल. कामात यश मिळेल मित्र परिवाराकडून यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. चांगली बातमी कानावर पडेल.

वृश्चिक
मंगल कार्यात सहभागी व्हाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. रविवारी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. याशिवास सावध आणि सतर्क राहावं लागेल. महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा.

धनु
दिवसाच्या शेवटी तुम्हाला कटकटीतून सटका मिळेल. रविवारचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. तुम्ही दिलेला सल्ला दुसऱ्यांच्या कामी येईल. महत्त्वाची कागदपत्र सांभाळा. आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे.

मकर
रविवारचा दिवस तुमच्यासाठी खास नसणार आहे. तुम्हाला खूप संघर्ष आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही हिंमत सोडून चालणार नाही. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील.

कुंभ
संपूर्ण दिवस तरतरी असेल. नोकरीमध्ये सफलता मिळेल. शत्रूंपासून सावध राहा आणि कौटुंबिक कलहापासून दूर राहा. येणाऱ्या दिवसांत आधी केलेल्या कामांमधून प्रगती, फायदा होण्याची शक्यता आहे. विचार केलेले कामं पूर्ण होतील. फायदा होवू शकतो.

मीन
रविवारी तुमचं काम चांगलं राहील. बोलण्याची कला यशाच्या शिखरापर्यंत घेऊऩ जाईल. मानसिक शांतता मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. सामाजिक कामे करण्यासाठी दिवस चांगला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click