September 27, 2021

आजचे राशिभविष्य !!

आजचे राशिभविष्य !!

मेष कामाच्या ठिकाणी काही बदल संभवतात. रखडलेले काम मार्गी लागेल.तुमचा राशी स्वामी मंगळ सिंह राशीत स्थित असून जिद्द, चिकाटी वाढवेल. प्रवास होतील. आर्थिक स्थिती ठिक राहील. दिवस चांगला आहे.

वृषभ अचानक धनलाभ होईल. शिक्षणात रुची वाढवणारा काळ आहे. चतुर्थ स्थानातील सूर्य मंगळ घरात काही कार्य होईल. घरातील शांतता भंग होऊ देऊ नका.खर्च बेताने करा. दिवस शुभ. 

मिथुन राशीतील चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे, त्यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल आणि आध्यात्मिक प्रगती होईल. भावंडाची गाठभेट होईल.वाद नको. दिवस उत्तम जाईल. 

कर्क व्यय स्थानातील चंद्र आज प्रकृती थोडी नाजूक ठेवेल. सर्दी पडसे इत्यादी तक्रारी असतील.कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. खर्च होईल. धार्मिक गोष्टीमध्ये मन रमेल. दिवस मध्यम जाईल.

सिंह लाभ स्थानातील चंद्र मित्र मैत्रिणींना भेटणं शक्य होईल. प्रवास योग येतील. घरांमध्ये महत्त्वाचा बदल होईल. नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील.आर्थिक स्थिती ठिक राहील. दिवस शुभ आहे.

 कन्या राशीतील शुक्र बुध बुद्धी अणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. खर्चाचं प्रमाण वाढतं राहील.सौंदर्य प्रसाधन, कपडे, दागिने यावर खर्च होणार आहे. दिवस चांगला जाईल. 

तुला भाग्य स्थानातील चंद्र शुभ असून आज काहींना अचानक प्रवासाचे योग येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहिल.आरोग्य ठिक असेल. मित्रमैत्रिणींना वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम. 

वृश्चिक आज प्रकृती थोडी सांभाळा.अष्टमात चंद्र मानसिक अणि शारीरिक त्रास दाखवत आहे. योग्य ती काळजी घ्या. शुभ काळ येणारच आहे. दिवस मध्यम.

धनु वैवाहिक जीवनात काही संघर्षाचे प्रसंगी येतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्यात यावेत. प्रकृती सांभाळा. कार्यक्षेत्रात शुक्र शुभ फळ देणारा ठरेल.दिवस मध्यम आहे. 

मकर षष्ठ चंद्र आज नातेवाईक भेट सुचवतो आहे. अष्टम मंगळ आहे. जपून रहा.कुठलेही वाद नको. आर्थिक निर्णय उद्यावर ढकला. हाताखालच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. दिवस चांगला.

कुंभ आज तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. संतती हट्टीपणे वागेल. जोडीदाराला सांभाळून घ्या.पण जमेल तितकी काम उरकून घ्या. दिवस शुभ. 

मीन आज नवीन परिचय होतील. खर्च खूप होतील.घरामध्ये काही जास्तीची काम आटपून घ्याल. घराकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु !!

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *