September 27, 2021

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्रपरिवार आणि स्वकीय यांच्यासमवेत स्नेहसंमेलन, समारंभाला जाणे होईल. दुपारनंतर मात्र काही कारणास्तव आपल्या तब्बेतीची तक्रार राहील.

वृषभ
कुटुंबातील व्यक्तींसमवेत आपण सल्ला- मसलत कराल. गृहसजावट आणि इतर बाबींमध्ये बदल करण्यात आवड निर्माण होईल. आईशी मनमोकळेपणा वाढेल तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

मिथुन
कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल.

कर्क
आजचा दिवस न्यायपूर्वक राहील. नियोजित कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रयत्नांती असा अनुभव येईल की केलेले प्रयत्न व्यर्थ गेलेत. तब्बेत बिघडू शकते. संताप वाढेल.

सिंह
आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक आणि मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल.

कन्या
आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रेम आणि तिरस्काराच्या राग, द्वेष इ. भावना सोडून समानतेने काम करण्याचा आजचा दिवस आहे.

तूळ
जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. पण दुपारनंतर, सायंकाळी अनर्थ होऊ नये यासाठी वाणीवर संयम ठेवा.

वृश्चिक
जवळचा प्रवास घडेल. धन विषयक आराखडा बनविण्यासाठी वेळ शुभ आहे. दुपारी वा सायंकाळ नंतर मित्र आणि संबंधितांसह प्रवासाचे नियोजन कराल. खाण्या-पिण्याचा आस्वाद घ्याल.

धनु
खूप परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. सहल प्रवास शक्यतो टाळा. दुपारनंतर अनुकूल वातावरण. शरीरात उत्साह संचारेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ.

मकर
भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबीयांशी परस्परांत मतभेद वाढणार नाहीत याकडे लक्ष द्या.

कुंभ
नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपारनंतर मानसिक व्यग्रता वाढेल. संपत्ती विषयक दस्तऐवज करण्यास वेळ अनुकूल नाही.

मीन
घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी आपणांस वातावरण अनुकूल राहील. जिभेवर संयम ठेवून आपण वादविवाद किंवा मनस्ताप टाळू शकाल. परिस्थिति सुधारणा होईल. आणखी वाचा

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *