March 31, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष
प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल माहेरकडून लाभ होतील. आणि चांगल्या वार्ता मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता.

वृषभ
विविध चिंता सतावतील.तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील. त्यामुळे घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल.

मिथुन
आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट वाढेल असे श्रीगणेश वर्तवितात. पत्नी आणि मुलाकडून लाभदायी वार्ता मिळतील. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल.

कर्क
आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता. कुटुंबात महत्त्वाच्या विषायवर चर्चा होईल.

सिंह
आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल आणि स्नेह्यांसोबत एखाद्या धर्मस्थळी जाण्याची सुवर्णसंधी लाभेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल.

कन्या
आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात. स्नेही आणि कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल.

तूळ
आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. यात्रा सहलीचे योग आहेत. मनोरंजनाची साधने आणि वस्त्रालंकार यांची खरेदी होईल.

वृश्चिक
शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच छुपे शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. कचेरीत सहकार्य चांगले मिळेल. मैत्रिणींशी भेट आणि प्रणय प्रसंगामुळे आनंद द्विगुणीत होईल.

धनु
आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील.

मकर
घरातील सदस्यांशी कटू प्रसंग घडतील. त्यामुळे मनात बेचैनी वाढेल. वेळेवर भोजन आणि शांत झोप मिळणार नाही. पाणी आणि स्त्री वर्गापासून जपून राहा.

कुंभ
चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल असे श्रीगणेश सांगतात. मनात उत्साह संचारेल. त्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल.

मीन
खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानी बाळगा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ढासळेल. आणखी वाचा

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click