April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेश कृपेने आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कुटुंबात आणि दांपत्यजीवनात सुख- समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. मौज-मस्ती आणि मनोरंजनामुळे भागीदारीत लाभ होईल. जीवनसाथी बरोबर सुसंवाद राहील.

वृषभ

उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.कोणाची चेष्टा- गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या. दुर्घटनेपासून जपा. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील. त्यावर ताबा ठेवा असे श्रीगणेश सांगत आहेत.

मिथुन

श्रीगणेश सांगतात की आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख- शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांना विवाहाचे योग आहेत. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तींची भेट आनंददायी ठरेल. उत्तम भोजन आणि उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

कर्क

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी खडाजंगी उडेल. गावात मानहानी होणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री- वर्ग वा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाला बळी पडाल असे श्रीगणेश सांगतात.

सिंह

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज शरीर आणि मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी- पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. भाग्योदयाच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तींचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाची गहनता लक्षात येईल आर्थिक लाभ होईल.

कन्या

मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. घरातील व्यक्तींशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यायला श्रीगणेश सांगतात. प्रवासाची शक्यता आहे. आयात- निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल.

तुळ

श्रीगणेश सांगतात की सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक आणि सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारां बरोबर विचार पटतील. मौज- मस्ती आणि मनोरंजनावर खर्च कराल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आज विदेशात राहणारे स्नेही आणि नातलगांकडून शुभ वार्ता मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्यजीवनात जीवनसाथीदाराच्या सहवासात वेळ घालवाल. कोर्ट- कचेरी प्रकरणात सांभाळून काम करणे उचित ठरेल.

धनू

प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. श्रीगणेश सांगतात की आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आज लाभदायक दिवस आहे. गृहस्थीजीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल व प्रवासाचे बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होईल. आणि लाभ होईल. विवाहयोग आहे. मंगलकार्ये होतील. उत्तम भोजनाचा आनंद मिळेल.

मकर

व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाला रंग चढतील. घर, परिवार आणि संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामानिमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल आणि सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होतील. श्रीगणेशांचा आपणांस पूर्ण आशीर्वाद आहे

कुंभ

श्रीगणेश सांगतात की आज स्वतःला अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्ट्या शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात अधिकार्‍यांपासून सावध राहा. तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या पातळीवर उतरणे योग्य ठरणार नाही. मौजमजेसाठी जास्त खर्च कराल. यात्रा प्रवासाचे योग आहेत. परदेशगमनाची शक्यता वाढेल. तसेच परदेशातून वार्ता मिळतील. संततीची काळजी लागून राहील.

मीन

अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी ठेवा. तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. खर्च वाढेल. अनैतिक वृत्ती संकटात टाकील. आध्यात्मिक विचार व काम आपणाला वाईट मार्गावर जाण्यापासून थोपवतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click