February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत. आयात- निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ आणि यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ आणि वाहनसुख मिळेल. वादविवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.

वृषभ

श्रीगणेशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या वार्ता मिळतील. आजारापासून सुटका होईल. नोकरदारांना लाभ होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल.

मिथुन

श्रीगणेश सांगतात की आज संतती आणि जीवनसाथी यांच्या तब्बेतीची काळजी राहील. वादविवाद, चर्चा यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळे त्रस्त व्हाल. नवीन कार्यारंभ आणि प्रवास करू नका असे श्रीगणेश सांगतात.

कर्क

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख वाटेल. वेळेवर जेवण मिळणार नाही. निद्रानाश होईल. धनखर्चाची व अपयशाची शक्यता आहे.

सिंह

कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासोबत यात्रेचे योग आहेत. तब्बेत चांगली राहील. आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीची भेट यामुळे खुश राहाल. शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ करा. अचानक भाग्योदयाची संधी श्रीगणेशांना दिसते.

कन्या

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. मिष्टान्न भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. हौस- मौज यांवर खर्च होईल. अनैतिक प्रवृत्तीपासून दूर राहा, असे श्रीगणेश सांगतात.

तुळ

आपले कलाकौशल्य व्यक्त करण्यास सुवर्णसंधी आहे असे श्रीगणेश सांगतात आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र आणि परिवारासह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र आणि वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट आणि कार्यसाफल्याचे योग आहेत. दांपत्य जीवनात गोडी राहील.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की, मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट यामुळे त्रासून जाल. अपघात व डॉक्टरी चिकित्सा यापासून सांभाळून राहा. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहा. संबंधितांबरोबर काही वाईट प्रसंग घडू शकतात. मानहानी- धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो.

धनू

आर्थिक, सामाजीक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद अनुभव येईल. मित्रांसोबत एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. जीवनसाथीचा शोध घेणार्‍यांना विवाह योग आहेत. मुलगा व पत्नी यांचेकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल आणि उत्पन्न वाढेल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा योग श्रीगणेश सांगतात.

मकर

श्रीगणेश म्हणात की आजचा दिवस संघर्षपूर्ण राहील. आज अग्नी, पाणी आणि वाहनांच्या दुर्घटनेपासून सावध राहा. व्यापारामुळे कार्यमग्न राहाल. व्यापारानिमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणाविषयी समाधान वाटेल. गृहस्थीजीवनात आनंद असेल. पैसा व प्रतिष्ठा मिळेल. मित्र व नातेवाईकांकडून लाभ होतील.

कुंभ

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मिश्रफलप्राप्तीचा. तब्बेत यथा- तथाच राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. अधिकार्‍यांशी सांभाळून राहणे हिताचे. अकारण खर्च वाढेल. आनंद- सोहळा, प्रवास- पर्यटन यांवर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे. परदेशातून वार्ता येतील. संतती विषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी कोणताही वाद घालू नका असा सल्ला श्रीगणेश देतात.

मीन

आजचा आपला दिवस मध्यम फळ देणारा जाईल असे श्रीगणेश सांगतात. मानसिक, शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभाचे योग. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील व पैसा मिळेल. तब्बेतीची काळजी घ्या. खर्चावर आवर घाला. अनैतिक काम घडू नये यासाठी संयम बाळगा. ईश्वरभक्ती व आध्यात्मिक विचारांचे पालन करा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click