February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र आणि कुटुंबीयां समवेत दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ आणि नियोजन करू शकतील. आपल्या हातून लोकहिताचे एखादे काम होईल.

वृषभ

विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करील. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वादविवाद यात यशस्वी व्हाल. वाचन- लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. पचनक्रियेची समस्या येऊन तब्बेत बिघडेल अशी शक्यता श्रीगणेशांना दिसते.

मिथुन

श्रीगणेशांच्या मते महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुम्ही द्विधा राहाल. आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने तब्बेत बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर चर्चा नको.

कर्क

कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी चांगला दिवस. मित्र आणि स्वकीयांशी भेट आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आर्थिक लाभ आणि समाजात आदर- सत्कार मिळेल. विरोधकांना पराभूत कराल. कोणाच्या प्रेमात पडाल.

सिंह

दूरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी पत्रव्यवहार लाभ देईल. कुटुंबात सुख शांती मिळेल. उत्तम भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आयोजन आणि अतिविचार संकट निर्माण करतील. स्त्री मित्र सहायक बनतील, असे श्रीगणेश सांगतात.

कन्या

वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होईल आणि सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक दिवस. तब्बेत चांगली राहील आणि मनही प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद साधाल. त्यामुळे सुख व आनंद मिळेल. धनलाभ व पर्यटन होईल. श्रीगणेशांचा वरदहस्त आपणावर राहील.

तुळ

आपले बोलणे आणि व्यवहार यांवर संयम ठेवा. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. द्विधा आणि अडचणी मनःशांती देणार नाहीत. आध्यात्मिक वाचन व ईश्वर नामस्मरण शांती देईल.

वृश्चिक

श्रीगणेश कृपा आपल्या गृहस्थी जीवनात सुख- शांती निर्माण करील. पत्नी आणि मुला कडून शुभवार्ता मिळतील. मंगलकार्ये होतील. विवाहयोग येतील. नोकरी धंद्यात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रां- सोबत सहलीला जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. वडीलधार्‍यांच्या सहकार्यामुळे प्रगती करू शकाल.

धनू

आज आर्थिक व व्यावसायिक नियोजन करण्यास दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे व्यवस्थित पूर्ण होतील. परोपकाराची भावना आज प्रबळ राहील. दिवस आनंदात जाईल. नोकरी व्यवसायात बढती व मानसन्मान मिळतील. गृहस्थ जीवनात आनंद भरून राहील.

मकर

श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. व्यवसाय बौद्धिक कार्यांत नवी विचारधारा अमंलात आणाल. लेखन व साहित्य यात सृजनात्मकता प्रकट होईल. मनाच्या एखाद्या कोपर्‍यात मात्र अस्वस्थता जाणवेल. परिणामतः शारीरिक थकवा व उबग येईल. संततीविषयक काळजी राहील. वरिष्ठ अधिकारी, प्रतिस्फर्धी यांच्याशी वादंग टाळा.

कुंभ

नकारात्मक विचारांनी मनात निराशा निर्माण होईल. मानसिक उद्वेग आणि रागाची भावना वाढेल. खर्च वाढेल. वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबात मतभेद व भांडण होण्याची शक्यता आहे. तब्बेत बिघडेल. दुर्घटनेपासून जपा. ईश्वराचे नामस्मरण आणि आध्यात्मिक वाचन आपणाला मानसिक शांती देईल असे श्रीगणेश सांगतात.

मीन

श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस सुख- शांतीत जाईल. व्यापारी वर्गाला भागीदारीसाठी उत्तम काळ. पत्नी- पती यांच्यात दांपत्यजीवनात जवळीक वाढेल. मित्र, स्वकीय यांच्याशी भेट होईल. प्रेमिकांचा रोमान्स गाढ बनेल. सार्वजनिक जीवनात प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक सुख उत्तम लाभेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click